श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न
आज शनिवार दि २८ / १२ / २०२४ रोजी दहिगाव- ने ता शेवगाव येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी मार्गशिर्ष वद्य त्रयोदशी या तिथीनुसार सर्व तिळवण तेली समाज धर्म बांधव दहिगावकर मंडळींनी अगदी उत्साहात मोठ्या भक्तीभावाने दिंडी प्रदक्षिणा काढून साजरी केली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने हभप अशोक महाराज बोरुडे श्री क्षेत्र भाविनिमगाव यांची प्रवचनरूपी सेवा आयोजीत करण्यात आली होती . अभिषेक, पुजा, आरती करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी मोठा संख्येने लाभ घेतला