जलभूमी वर्धापन दिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण
जलभूमी प्रतिनिधी
---------------
नगर : विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना जलभूमी वर्धापन दिनाच्या निमित्ताने जलभूमी फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीनी आपले प्रस्ताव पाठविण्यात यावेत.असे आवाहन जलभूमी फाऊंडेशनचे सचिव बाळासाहेब जाधव यांनी केले आहे.
जलभूमी फाऊंडेशन नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर आहे. जलभूमी वृत्तपत्र चालू होवून तीन वर्षे पूर्ण झाले आहेत. चौथ्या वर्षांत पदार्पण करत आहे.
यानिमित्ताने जलभूमी फांऊंडेशनने पत्रकारांबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीला आदर्श पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आदर्श पुरस्कार मिळाल्यानंतर त्या व्यक्तीला काम करण्यास प्रोत्साहन मिळेते. या भावनेने सामाजिक, शैक्षणिक ( मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार (वेगवेगळे तीन), धार्मिक ( किर्तन, प्रवचन, गायक यापैकी एक ) प्रशासकीय ( केंद्रीय, राज्य सरकारी अधिकारी,कर्मचारी ) पत्रकारिता (संपादक, उपसंपादक, वार्ताहर), समाजप्रबोधन ( लोककला ), उद्योग, आरोग्य, प्रगतशील शेतकरी, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना जिल्हास्तरीय आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सदर पुरस्कार प्रस्ताव दि.३१ ऑगस्ट पर्यंत पाठविण्यात यावेत.
आलेल्या प्रस्तावाची निवड समिती छाननी करून पुरस्कारकर्त्यांची नावे पुढील सात दिवसात जाहीर करतील. सप्टेंबर मध्ये होणाऱ्या जलभूमी वर्धापन दिन कार्यक्रमात जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार प्रदान राजकीय, प्रशासकीय अधिकारी ,जेष्ठ पत्रकार, मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तरी विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींनी दि. ३१ ऑगस्ट पर्यंत दोन पासपोर्ट फोटोसह उल्लेखनिय कामाची माहिती (प्रस्ताव ) बाळासाहेब मुरलीधर जाधव, जलभूमी कार्यालय, शेवगाव - नेवासा राजमार्ग, भातकुडगांव फाटा पो. भातकुडगांव ता.शेवगाव जि.अहमदनगर पिन-४१४५०२ (मो.९९२१७४५२६६, ९८३४९६७७६७ ) या पत्यावर पाठविण्यात यावेत. कोणत्या पुरस्काराठी प्रस्ताव पाठविला आहे. त्या पुरस्काराचा स्पष्ट उल्लेख करावा. उशिरा येणाऱ्या पुरस्कार प्रस्तावाचा विचार केला जाणार नाही. उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवून सहभागी व्हावे.असे आवाहन जलभूमी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवम जाधव, उपाध्यक्ष शंकर मरकड, सचिव बाळासाहेब जाधव यांच्या सह जलभूमी परिवाराने केले आहे.