दहिगाव -ने येतील
जनता शिक्षण प्रसारक मंडळ शैक्षणिक संकुल दहिगाव-ने येथे आज MPSC मार्फत तसेच इतर स्पर्धा परीक्षेच्या मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम शेवगाव-पाथर्डी चे माजी आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी कु.स्नेहल खंडागळे (PSI),अशोक दिंडे (PSI),प्रतिक घाडगे (PSI),नितीन सुपेकर (PSI),करिष्मा शेख (बीड पोलीस),सोमनाथ सातपुते (रोबो ऑपरेटर युरोप मध्ये सिलेक्शन) तसेच संभाजी पवार (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुंबई),भागचंद शिंदे (महाराष्ट्र पोलीस बीड),भाऊसाहेब पवार (सेवानिवृत्त मेजर) तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ तालुका अध्यक्षपदी श्री.रावसाहेब मरकड यांची निवड झाल्याबद्दल या सर्वांचा मा.आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी चेअरमन,व्हा. प्रशासकीय अधिकारी शैक्षणिक संकुलातील सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.