दहिगाव नेत कबड्डी (Kabaddi) स्पर्धा आयोजित
दहिगांव ने ता.शेवगाव येथे स्व . मारूतरावजी घुले पाटील क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान दहिगांव - ने आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना मा. आ. चंद्रशेखर घुले व उपस्थित मान्यवर.
ग्रामीण खेळाडूंनी कबड्डी खेळात राज्य- राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले यश कौतुस्कास्पद व अभिमानास्पद असुन कबड्डी खेळाच्या ग्रामीण खेळाडूंना सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देऊन सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले .शेवगांव तालुक्यातील दहिगांव ने येथे स्व . मारूतरावजी घुले पाटील क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान दहिगांव - ने आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शनात श्री. घुले बोलत होते.
यावेळी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, नवनाथ महाराज काळे, पोलीस उपनिरीक्षक ढाकणे , कबड्डी असोशिएनचे प्रशासकिय आधिकारी सचिन भोसले,सेवा सोसायटी चेअरमन शब्बीर शेख, जहाँगीर शेख, सरपंच सुभाष पवार, उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुध्दे, महेबुब शेख, राजु शेख ,प्रा शिवाजी वाबळे, शेंदूरवादा सरपंच रावसाहेब टेके, मेजर सर्जेराव घाणमोडे ,मा.व्हा.चेअरमन बाळासाहेब मरकड,मेजर हरिभाऊ पाठे ,प्रा.दत्ता वाकचौरे, प्रा .डॉ..संभाजी काळे, प्रा. बाळासाहेब काळे,डॉ .प्रशांत लोखंडे, बंडू सातपूते, विलासराव लोखंडे, कडूबाळ घुले, सुरेश घाणमोडे ,सुभाष पानसरे, शहानवाज शेख ,युसुफ शेख,समीर पठाण, नियाज शेख,दत्तु ताके, सचिन कसबे,सतीष हुलगे,पप्पु छडीदार ,अशोक गुंजाळ ,विष्णु गुंजाळ,अमोल बोरुडे, मेजर एकनाथ लिंबोरे ,मेजर संतोष घुले, इर्शाद शेख ,मेजर संभाजी पवार, मेजर उध्दव घाणमोडे, मेजर भाऊसाहेब पाचुडे, मेजर शंकर शिंदे, मेजर संतोष शिंदे, मेजर किरण शिंदे, भारत बोरूडे, संतोष पठाडे,अंबादास पठाडे, वैभव सोनवणे, खुर्शीद पठाण, भाऊलाल जिरे, युसुफ बागवान,राजु पठाण यांचे सह मोठ्या संख्येने कबड्डीप्रेमी उपस्थित होते. यावेळी हभप नवनाथ महाराज काळे, सर्जेराव घाणमोडे, पोलीस उपनिरीक्षक ढाकणे, सचिन भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्पर्धा यशस्वीतेसाठी समता कला व क्रिडा क्लब व जयहिंद कला व क्रिडा क्लब सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत .सूत्रसंचालन त्रिमुर्ती प्रतिष्ठानचे प्रा. गाडे यांनी केले तर आभार मेजर संतोष घुले यांनी मानले .