लोकनेते मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या सुदामराव मते पाटील विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूची निर्मिती करून एक चांगला उपक्रम सुरू केला आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती एस. बी. महाजन व सर्व शिक्षकानी विद्यार्थ्यांना टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्मिती करण्यासाठी बाहुली बनवण्याचा विषय दिला आणि त्यानुसार प्रत्येक विद्यार्थिनींनी स्वतः बाहुलीची निर्मिती करून तो साकार केला.
गृह सजावटीसाठी आपण नेहमी वेगवेगळ्या खेळणी चा पण वापर करतो त्याच पद्धतीने केलेल्या उपक्रमाचं सर्व विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापिका श्रीमती एस. बी. महाजन यांनी कौतुक केले. परिसरातील विविध उपक्रम राबवणारे विद्यालय म्हणून सुदामराव मते पाटील विद्यालयाकडे बघितले जाते विद्यालयात सन 2021 -22 पासून सेमीचा वर्ग सुरू असून विद्यार्थ्यांची अभ्यासाच्या तयारी बरोबरच संगणक प्रशिक्षण ,क्रीडा संगीत, क्रीडा, गायन चित्रकला, इत्यादी विषयात तयारी करून घेतली जाते तसेच विविध राष्ट्र पुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी उत्सव साजरे केले जातात.या सर्व उपक्रमासाठी विद्यालयाचे शिक्षक श्री संजय भुसारी श्री बाळासाहेब घावटे ,श्री नानासाहेब घुले श्री दत्तात्रय काळे श्री प्रवीण पवार श्री समीर पठाण सौ. सुनीता काळे (आरगडे), श्री महेश पवार श्री वैभव गरड श्री पांडुरंग उगले श्री विजय गायकवाड श्री रघुनाथ म्हस्के प्रयत्नशील असतात.