शेवगाव अहमदनगर
दहिगाव-ने:- जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नवजीवन विद्यालय दहिगावने येथे माजी आमदार डॉ. नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप शेवगाव डी.वाय.एस.पी.सुदर्शन मुंढे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मातीच्या गोळ्याला आकार देणाऱ्या सर्व गुरुवर्यांना समाजाने मानाचे स्थान द्यावे. शिक्षण म्हणजे सत्याचा जवळ जाण्याचा मार्ग होय. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून परिसरातील गरीब मुलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मा.आ.डॉ. नरेंद्रजी घुले पाटील हे मोठे कार्य करत आहे कारण आज या शैक्षणिक संकुलात पूर्ण अहमदनगर जिल्ह्यातून बारा ते पंधरा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.याच खऱ्या डॉ.नरेंद्रजी घुले पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे गौरवोद्गार काढून त्यांनी साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, स्वतः खडतर जीवन प्रवास करून पोलीस क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार मिळवताना अनेक समस्यांना सामोरे जाऊन यशस्वी वाटचाल कशी केली याचा विद्यार्थ्यांसमोर त्यांनी थोडक्यात जीवनपट सांगितला.
निश्चित ध्येय ठरवणे हे शालेय जीवनात खूप महत्त्वाचे आहे व त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी मेहनत, जिद्द व आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट या जगात अशक्य नाही या विद्यालयाचा गुणवत्तेचा आलेख हा उंचावत जाणाराच आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर रामनाथ भाऊ राठी, शब्बीरभाई शेख, राजाभाऊ पाऊलबुद्धे, जहांगीरभाई शेख, बाळासाहेब मरकड, संभाजी आगळे, विद्यालयाचे प्राचार्य अशोक उगलमुगले, उपप्राचार्य शंकर कांबळे, पर्यवेक्षक सुनील शिंदे, संजय बडे, सुरेश घाणमोडे, काकासाहेब घुले सर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी उपसरपंच राजाभाऊ पाऊलबुद्धे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या प्रास्ताविकपर भाषणात विद्यालयाचे प्राचार्य अशोक उगलमुगले यांनी कार्यक्रमाविषयी व विद्यालय विद्यार्थ्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मच्छिंद्र पानकर,श्री.बाळासाहेब मंडलिक व श्री.मकरंद बारगुजे यांनी केले तर आभार डॉ. रमेश खैरे यांनी मानले.
प्रतिनिधि - अशोक वाघ शेवगाव अहमदनगर