नेवासा तालुक्यातील गोपाळपुर येथे सलाबात प्रमाणे दि. 22 मे रोजी सुरू झालेल्या त्रिदिनात्मक अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता 24 मे रोजी करण्यात आली.
त्रिदिनात्मक अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा ।। श्री किसनगिरी विजय ग्रंथ पारायण सोहळा निमित्ताने श्री क्षेत्र देवगड संस्थानचे श्री महंत गुरुवर्य प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तनाने सांगता झाली.
यावेळी गावातील भजनी मंडळ, ग्रामस्थासह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधि अशोक वाघ - शेवगाव अहमदनगर