शेवगाव :-
"ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे,तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो"असा संदेश देणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचे व्यक्तिमत्व हे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे होते. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म ३१ मे १७२५ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा गावात झाला हे आपले भाग्यच आहे. अहिल्याबाई ह्या हुशार,क्षमाशील आणि शांत स्वभावाच्या होत्या त्यामुळे दूरदृष्टी ठेवून मल्हाररावांनी पुरुषप्रधान संस्कृतीच्या काळातही युद्धाचे व डावपेचाचाचे धडे, राजकारण या सर्व गोष्टींचे प्रशिक्षण त्यांना दिले. अहिल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही.त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांच्या अडचणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. त्यांनी जनतेच्या आणि रयतेच्या काळजीपोटी अनेक समाज उपयोगी कार्य केले.शेतकऱ्यांना जाचक करातून मुक्त केले, गोपालनाचे महत्व पटवून देऊन प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले. विद्वान विद्यार्थ्यांसाठी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करून जतन केली. शाळा काढून विद्या प्रसाराचे काम केले, देशभरातील मंदिरांच्या जिर्णोद्धाराचे काम त्यांनी हाती घेतले, धर्मशाळा, तलाव,विहिरी,बारव, भोजनालय यांची उभारणी केली. रया गेलेल्या तीर्थक्षेत्रांना त्यांनी उजाळा दिला.काश्मीर ते कन्याकुमारी असे त्यांचे धार्मिक कार्य होते.एक अतिशय कर्तुत्ववान,दानशूर ,कार्यक्षम व आदर्श राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.असे प्रतिपादन शेवगाव तालुक्यातील भविनिमगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून शेवगाव-पाथर्डी चे युवा नेतृत्व शेवगाव पंचायत समितीचे मा.सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहिल्यादेवी होळकर , राज माता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक उत्सव समितीचे सर्व सदस्य, माजी सैनिक, आदी मान्यवर, ग्रामस्थ, उपस्थित होते.
My Sahyadri Shevgaon Ahmednagar
mysahyadrilive@gmail.com