Ahmednagar Maharashtra
Newasa :- 
मोहिनीराज महाराज की जय असा जयघोष करत भगवान विष्णूंच्या "मोहिनी"अवताराचे एकमेव स्थान असलेल्या नेवासेनगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत बुधवारी रात्री लखलखत्या अग्नीच्या खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात "भळंद" कार्यक्रम पार पडला
रथ सप्तमी पासून सुरु झालेल्या ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या उत्सवामुळे तीर्थक्षेत्र नेवासेनगरीत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.माघ शुध्द पोर्णिमेस गावातील सर्व कुटुंबातून कुलधर्म कुंलाचार केला जातो या वेळी देवाला पूृरणपोळीचा नैवेद्यही दाखविला जातो. माघ पोर्णिमेच्या बुधवारी रात्री मंदिराच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या मंडपात गोंधळ घालीत "भळंद"खेळत देवतेला यात्रा उत्सवासाठी आमंत्रण देण्यात आले.यावेळी गोंधळ कलाकार रेडीओ स्टार नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथील दिगंबर गोंधळी यांनी संबळाच्या निनादात देवीची भक्ती गीते गायली त्यांना शुभम गोंधळी व बालकलाकार श्रीनिवास गव्हाणे यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली.
प्रारंभी मांडलेल्या देवीच्या चौरंगावर गणेशपूजन, पुण्याहवाचन करून जगदंबेला अभिषेक घालण्यात आला.यावेळी देवीचा जागर करीत श्रीरामपुर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रेवणनाथ महाराज जोशी व आदिनाथ जोशी यांनी लखलखत्या अग्नीचे खापराचे भांडे तळहातावर घेऊन पारंपरिक उत्साहात "भळंद"कार्यक्रमाद्वारे देवदेवतांना मोहिनीराजांच्या उत्सवाचे निमंत्रणदेण्यात आले भळंद कार्यक्रमानंतर महाआरती करण्यात आली यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य शहरातील युवा पुरोहित पांडूगुरू जोशी व निखिल जोशी,नारायण बडवे,अनिल बडवे यांच्यासह ब्रम्ह वृंद मंडळींनी केले.
नेवासा शहरातील भाविक उपस्थित होते.

गुरुवारी दि.१७ फेब्रुवारी रोजी पहाटे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांचा महाभिषेक तहसीलदाराच्या हस्ते करण्यात आला. दुपारी ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या उत्सव मूर्तीचे मंदिरातून पाच दिवस पाकशाळेकडे(श्री मोहिनीराज मंगल कार्यालय येथे प्रस्थान करण्यात आले. उत्सव काळात प्रवरानदीतीरावर असलेल्या या स्थानावर पाच दिवस ही दिवस संपूर्ण ग्रामस्थांना महाप्रसादाचे सालाबादप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे.सोमवारी दि.२१ फेब्रुवारी रोजी यात्रा उत्सवाचा मुख्य दिवस असून सायंकाळी काल्याची दहीहंडी फोडली जाणार आहे.
थोडे नवीन जरा जुने