अहमदनगर my sahyadri team
शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने येथील कृषि विज्ञान केंद्र -२ च्या प्रशासकीय इमारत आणि शेतकरी निवास चे उद्घाटन बुधवार दि. २९ डिसेंबर २०२१ रोजी मा.डॉ. ए. के. सिंह, उपमहासंचालक, कृषि विस्तार, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. ही प्रशासकीय इमारत कृषि विज्ञान केंद्राच्या विविध उपक्रमासाठी तसेच शेतकरी निवास हे प्रशिक्षण दरम्यान शेतकऱ्यांना राहण्यासाठी व कृषि विज्ञान केंद्र भेटीसाठी आलेल्या शेतकरी व अधिकारी यांना राहण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने हे दक्षिण नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कार्यरत असून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये विविध प्रशिक्षणे घेतली जातात त्यासाठी अद्ययावत सोयीनी युक्त प्रशिक्षण हॉल व शेतकऱ्यांची राहण्याची गैरसोय होऊन नये म्हणून शेतकरी निवासाची सोय या ठिकाणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्रजी घुले पाटील यांचे अध्यक्षतेखाली ७ वी शास्रीय सल्लागार सभा पार पडली. या शास्रीय सल्लागार समिती बैठकीस श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील, डॉ. लाखन सिंह संचालक आय.सी.ए.आर. अटारी झोन-८पुणे, विश्वस्त मा.आ. पांडुरंग अभंग, काकासाहेब शिंदे, सचिव अनिल शेवाळे, रविंद्र मोटे, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. शरद गडाख, डॉ. आनंद सोलंकी कृषिविद्या विभाग प्रमुख, डॉ.अशोक ढगे, आकाशवाणी अहमदनगर चे कार्यक्रम अधिकारी भैय्यालाल टेकाम, शशिकांत जाधव तसेच प्रगतशील शेतकरी आप्पासाहेब फटांगडे, रतन मगर, हुकूम बाबा नवले, नामदेव चेडे, बाळासाहेब मरकड, संजय तनपुरे, सूर्यभान नवले, रेवणनाथ उकिर्डे, सतीश विधाटे, श्री. सोमेश्वर लवांडे, सौ.पुष्पा अर्जुन उर्फ बाळासाहेब नवले आदी उपस्थित होते.
यावेळी कृषि विज्ञान केंद्रामार्फत सुरु असलेल्या विविध ३० प्रात्यक्षिक प्रकल्पांमधील तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपयोग करून घ्यावा असे त्यांनी सुचविले आणि केंद्राच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कृषि विज्ञान केंद्रा मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देतांना केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. कौशिक शामसुंदर म्हणाले ७ तालुक्यात आणि ६७९ गावांचे कार्यक्षेत्र आहे.शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ नारायण निबे, नंदकिशोर दहातोंडे, इंजि.राहुल पाटील, सचिन बढधे, प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे व वैभव नगरकर यांनी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सभेस उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दहीगाव-ने कृषी विज्ञान केंद्र "कांदा तंत्र " या अॅप चे अनावरण करण्यात आले. बैठीकीपूर्वी शास्त्रीय सल्लागार समितीच्या सदस्यांना केव्हीकेच्या प्रक्षेत्रावरील विविध प्रकल्पांना भेटी देऊन माहिती दिली. सदर कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्राचे प्रविण देशमुख, अनिल देशमुख, दत्तात्रय वंजारी, संजय थोटे व संजय कुसळकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागडे सर यांनी केले तर आभार माणिक लाखे यांनी मानले.
My Sahyadri shevgaon Ahmednagar