शेवगाव अहमदनगर :-
Krishi Vigyan Kendra, Dahigaon. Conducts online workshop on World Bee Day and Kharif Season Preparation
भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाले. यांचे औचित्य साधून श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव. ने अंतर्गत दिनांक 20 मे 2021 रोजी जागतिक मधुमक्षिका दिन व खरीप हंगाम पूर्व पीक नियोजन ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. श्याम सुंदर कौशिक यांनी केले. सदर कार्यशाळा माजी आ. श्री.चंद्रशेखर घुले पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या कार्यक्रमास माजी. आ.डॉ. नरेंद्रजी घुले पाटील साहेब, मा. आ. श्री.पांडुरंग अभंग, श्री. अनिल शेवाळे सचिव श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था भेंडा, व मा. श्री. शिवाजीराव जगताप जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
20 मे हा दिवस जागतिक मधुमक्षिका म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ह्या कार्यशाळेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले. सध्या देश कोविड-19 महामारिशी सामना करत असून अशा परिस्थितीत ही लोकांना एकत्र येऊन कार्यशाळा घेणे शक्य होत नसल्यामुळे जागतिक मधुमक्षिका दिन व खरीप हंगाम पूर्वनियोजन कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली.
आपण आपल्या जीवनात मधुमक्षिका सारखे कार्यरत राहून कुठल्याही स्वार्थ न बघता एका दिलाने काम केलं पाहिजे असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ. श्री. चंद्रशेखर घुले पाटील साहेब यांनी सांगितले.
यावेळी डॉ. संदीप लांडगे, सहाय्यक प्राध्यापक किड विज्ञान विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी मधुमक्षिका तिचे महत्त्व, मधु निर्मिती तसेच वनस्पती मध्ये परागीभवनासाठी चे महत्व विशद केले. त्याचप्रमाणे आरोग्य मध्ये मधुमक्षिका व मधाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
खरीप हंगाम पूर्व नियोजन करत असताना माती परीक्षण, बीज उगवण तपासणी, योग्य वणाचा वापर , योग्य बीज प्रक्रिया, जिवाणू खताचा वापर सॉईल सोलरायझेशन तंत्रज्ञान अवलंब करणे याविषयी डॉ. श्याम सुंदर कौशिक यांनी मार्गदर्शन केले.
खरीप हंगामापूर्वी नियोजनात पाण्याचा योग्य वापर करून आधुनिक तंत्रज्ञान वापरून पीक उत्पादन घेण्यासाठी, पूर्वमशागत, सपाट वाफे, सरी-वरंबे, बंदिस्त सरी, समपातळीत मशागत, जमिनीच्या मगदुराप्रमाणे पीक नियोजन, मोसमी पावसाच्या पाण्याचे नियोजन , हवामान आणि हंगामनिहाय बागायत, जमिनीच्या खोलीनुसार पिक नियोजन, कमी पाऊस पडणाऱ्या भागात जलसंधारण आच्छादनाचा वापर, जैविक बोध, आंतर पिकपद्धती आणि एकात्मिक शेती पद्धतीचा वापर याविषयी श्री. नारायण निबे विशेष विशेषज्ञ यांनी मार्गदर्शन केले.
शास्त्रज्ञ श्री सचिन बडधे यांनी कपाशी व ऊस लागवडीसाठी करावयाचे पूर्वनियोजन जसे पूर्वमशागत, योग्य वाणांचा वापर, लागवड व्यवस्थापन तसेच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास विविध तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी, डॉ.अशोक ढगे, दादासाहेब गंडाळ, दत्तात्रय घुले, विठ्ठल देशमुख, ज्ञानेश्वर दौंड, रेवननाथ उकिर्डे, विविध इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडीया पत्रकार प्रतिनिधी व मोठ्या संख्येने शेतकरी ऑनलाईन उपस्थित होते. त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री. माणिक लाखे श्री.नंदकिशोर दहातोंडे डॉ. सोमनाथ भास्कर, प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे उपस्थित होते. तसेच ऑनलाइन कार्यक्रमाची जबाबदारी श्री. प्रवीण देशमुख श्री. वैभव नगरकर यांनी पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार श्री.राहुल पाटील विषय विशेषज्ञ कृषी अभियांत्रिकी यांनी केले.
माय सह्याद्री टिम - अहमदनगर
अशोक वाघ - शेवगाव ,अहमदनगर