अहमदनगर :-
शेवगाव तालुक्यात वाढती रुग्ण संख्या व बेडची कमतरता भासत असुन रेमडिसीवर इंजेक्शन असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
यातच अहमदनगर जिल्हा परिषद उपाध्यक्षा नामदार सौ राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डाॅ. क्षितिज भैया घुले पाटील यांच्या प्रयत्नातून शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे 50 बेडचे कोवीड केअर सेंटरास मंजुरी मिळाली आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मिश्रीफ यांच्या कडे केली होती, मागणी याला तात्काळ संमती मिळाली आहे.
या कोविड केअर सेंटर मुळे बोधेगावसह परिसरातील सर्व सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल.
माय सह्याद्री टिम - अहमदनगर
अशोक वाघ शेवगाव