A व B नावाचे दोन मुले असतात ते  लहानपणापासून एकाच वर्गात शिक्षण घेत होते.   


पुढे जाऊन ते एकाच College मध्ये, उच्च शिक्षण घेत  एकाच वर्गात शिकत होते.    


शिक्षण पूर्ण करुन दोघे नोकरीच्या शोधात फिरत होते. एका दिवशी पेपर मध्ये जाहीरात आली कि या कंपनी साठी 2 मॅनेजर हवे आहे .  या दोघांनी ती बातमी पाहुण जायचे ठरवले.

सकाळी लवकर आवरून दोघे कंपनीच्या ऑफिस मध्ये जातात .


Interview साठी भरपूर मुले तेथे आले होते त्यात हे दोघे हि होते 


आधी  A चा interview झाला नंतल B चा झाला दोघे बाहेर आले आणि घरी गेले.

रात्री बाॅस चा B ला फोन आला अभिनंदन तुझी निवड आमच्या कंपनीत मॅनेजर म्हणून झाली आहे.   

आता B लगेच खुश होऊन A कडे जातो आणि सांगतो कि माझी निवड झाली. पण यात A ला प्रश्न पडतो कि आपले दोघांचे एक सारखे शिक्षण असताना माझी निवड का झाली नाही असा प्रश्न A ला पडला .

हे जीवलग मित्र असल्याने दोघांनी बाॅस ला विचारायचे ठरवले 
 कि आमच्या पैकी एकाची निवड का ? 



दोघे सकाळी कंपनीच्या ऑफिस मध्ये जातात आणि बाॅस समोर 
दोघे तो प्रश्न विचारतात सर आमच्या पैकी तुम्ही एकाचीच निवड का केली आमचे तर दोघांचे एकसाखरे शिक्षण आहे.  आणि तुमच्या कंपनी तर 2 जागा भरायच्या होत्या.    तरी तुम्ही आमची एकाची निवड केली .



Boss - बाॅस तर बाॅस असतो दोघांना एक काम सांगतो 
आधी A ला सांगतो जा बाहेर आणि आपल्या भागा मध्ये किती लोक आंबे विकतात हि जाऊन चौकशी करुन ये 



A जातो आणि चौकशी करुन येतो  आणि बाॅस ला म्हणतो आपल्या भागात एक आंबा विक्रेता आहे 

बाॅस पुन्हा A ला म्हणतात जा तु आणि काय आंब्याचा भाव आहे ते चौकशी करुन ये  पुन्हा A जातो आणि चौकशी करुन येतो आणि बाॅस ला म्हणतो सर 40 रु किलो आंबे आहे.


बाॅस मनात विचार करतात आणि  पुन्हा A  ला म्हणतात जर 10 किलो अंबे घेतले तर काय भाव देशील याची चौकशी करुन ये  

पुन्हा A आंबा विक्रेता कडे जातो आणि चौकशी करुन येतो आणि बाॅस ला म्हणतो सर 10 किलो जर घेतले तर 30 रुपये किलो भाव देईल तो. 


आता हेच काम बाॅस B ला सांगतात

B बाहेर जातो आणि चौकशी करुन येतो 

आणि बाॅसला सांगतो सर आंबा 40 रुपये किलो आहे आणि 10 किलो घेतले तर 30 रुपये किलो पडतील 

आंबा हापूस या जातीचा आहे आणि या .... भागातून घेतला जातो.

आपण जर डायरेक्ट त्या .... भागातुन आणला तर 20 रु किलो पडेल आणि मार्केट पेक्षा कमी भावात  आपण 30 रु किलो विकुन प्रति किलो माघे 10 रु नफा आपण कमवू शकतो  आणि मोठा नफा आपल्या कंपनीला होऊ शकतो.

आता मित्रांनो तुम्हीच ठरवा कोणाला कामाला ठेवले पाहिजे  A कि B ?




थोडे नवीन जरा जुने