अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील आव्हाणे खुर्द येथील अभिजित सुरेशराव आहेर यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाली असुन निवडीचे पत्र अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांचे हस्ते निवडीचे पत्र आहेर यांना देण्यात आले.
याप्रसंगी लोकनेते मारुतरावजी घुले पाटील, ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे प्रमुख मार्गदर्शक व चेअरमन माजी आ. डाॅ. नरेंद्रजी घुले पाटील यांचे हस्ते अभिजित आहेर यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी माजी आ. नरेंद्रजी घुले पाटील यांनी सांगितले की कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरलेले असताना कोरोना सारख्या महामारी वर सिरम इन्स्टिट्यूट व भारत बायोटेक यांनी शोधलेल्या लसीमुळे सर्वाना दिलासा मिळाला असून ग्रामीण भागाच्या लसीकरणात युवकांनी महत्वाची भूमिका पार पाडावी अशी भावना माजी आ. डाॅ. नरेंद्रजी घुले पाटील यांनी व्यक्त केली. युवकांनी घरातील आबाल वृध्याना लस घेण्यास प्रवृत्त करावे असे आवाहन घुले पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष अभिजित आहेर यांनी सांगितले की युवकांचे आशास्थान सभापती डॉ क्षितिजभैय्या घुले पाटील यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थी चळवळीला गती देण्याचा प्रयत्न करु. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आहेर यांनी सांगितले. ज्ञानेश्वरचे संचालक जेष्ठ नेते काकासाहेब नरवडे ,काशिनाथ आण्णा नवले, बबनराव पा भुसारी, पंडितराव भोसले, दादासाहेब गंडाळ,काकासाहेब शिंदे अशोकदादा मिसाळ,विष्णुपंत जगदाळे, अंबादास कळमकर,चंद्रकांत निकम. मुख्य शेतकी अधिकारी सुरेशराव आहेर ,संजय भुसारी,संभाजी भुसारी,सुरेश भुसारी उपस्थित होते निवडीबद्दल सभापती डॉ क्षितिजभैय्या घुले पाटील, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनीलभाऊ गव्हाणे,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष शुभम बंब जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद कर्नावत, ज्ञानेश्वर आरगडे नेवासा तालुका अध्यक्ष अक्षय भसारी यांनी अभिनंदन केले आहे
अशोक वाघ - शेवगाव अहमदनगर