जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा ना. सौ. राजश्रीताई घुले यांच्या हस्ते सन्मान
शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने येथील कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव –ने यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.महिलांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असून शेती क्षेत्रात देखील महिलांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा मा. ना. सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी केले. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना महिला भगिनीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांनी देखील आपली मते मांडली. यावेळी श्री. मारुतराव घुले पा. शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. काकासाहेब शिंदे, जिल्हा परिषद सदस्या डॉ. तेजश्री लंघे, दहीगाव-ने चे सरपंच श्री. सुभाष पवार इतर मन्यवर मंचावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित आरोग्य अधिकारी डॉ. के. के. कानडे यांनी महिलांनी आरोग्याबाबत व कोरोना काळात घ्यावयाची काळजी याबद्दल मार्गदर्शन केले. श्री. काकासाहेब शिंदे यांनी शेतीमध्ये महिलांचे महत्व अधोरेखित केले. महिला सरपंच सौ. उज्वला मेरड यांनीही याप्रसंगी आपले विचार व्यक्त केले. यावेळी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव –ने च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या डॉ. सौ. वैशाली करणसिंह घुले, सौ. सुरेखा सोपान नवथर, सिस्टर बिंदू जोसेफ, सौ. शोभा एकनाथ चव्हाण, सौ. प्रियंका शरद आरगडे, सौ. स्वाती गणेश माताडे, सौ. वर्षा रामकिसन सोनवणे, सौ. नर्मदा शिवाजी वीर या महिलांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. तसेच आरोग्य क्षेत्रामधील उल्लेखनीय कार्याबद्दल दहीगाव-ने चे आरोग्य अधिकारी डॉ. के. के. कानडे यांचा व सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल नामदार सौ. राजश्रीताई घुले पा. यांचा कृषि विज्ञान केंद्र दहीगाव-ने च्या वतीने प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक केव्हीके दहीगाव-ने चे प्रमुख डॉ. कौशिक यांनी केले. तल यावेळी त्यांनी महिला समानता, उद्योजकता आणि सशक्तीकरण या भारत सरकारच्या संकल्पनेबद्दल माहिती दिली. यावेळी कृषि विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ माणिक लाखे, सचिन बडधे, नारायण निबे, नंदकिशोर दहातोंडे, डॉ. सोमनाथ भास्कर, प्रकाश बहिरट हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि.राहुल पाटील तर आभार प्रकाश हिंगे यांनी मानले.
माय सह्याद्री टिम - शेवगाव अहमदनगर
अशोक वाघ - शेवगाव