कोटाच्या मुलांचे JEE-Mains मध्ये घवघावीत यश

अहमदनगर-शेवगाव :- 

चांगली बुद्धी व इच्छा शक्ती असेल तर तुम्हाला यशा पासून कोणीही रोखु शकत नाही. कष्ठ व जिद्दीच्या बळावर तुम्ही कुठल्याही क्षेत्रात प्रगती करू शकतात असे प्रतिपादन शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी शेवगाव येथे केले. JEE Mains परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या कोटा एक्सलन्स सेंटरच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन शेवगाव येथे करण्यात आले होते. यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.

कार्यक्रमासाठी आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे शिक्षण समिती प्रमुख प्रा. लक्ष्मणराव बिटाळ, काकडे विद्यालयाचे माजी प्राचार्य चंद्रकांत आहेर, प्रभारी प्राचार्य श्री.करमसिंग वसावे, निर्मल ब्राईट फ्युचर स्कूलचे प्राचार्य गणेश पालवे, कोटा एक्सलन्स सेंटरचे प्रमुख हरिष खरड, प्रा.जितेंद्र मालवीया, डायरेक्टर राजेश दारकुंडे, अॅकडमीक डायरेक्टर प्रा.शिव अग्रवाल आदि प्रमुख उपस्थितीत होते.

पाटील बोलताना म्हणाले की, जीवन हे अनमोल आहे, त्याचा सदउपयोग करावा. ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी वेळ देतात. जिथे आपला पाल्य चुकतो तिथे पालक लक्ष देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार क्षेत्र निवडावे व पालक, शिक्षक, शाळा, संस्था यांचे नाव उज्वल करावे असेही ते बोलताना म्हणाले. 



बिटाळ म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी कोटा राजस्थान या ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही म्हणून दूरदृष्टी ठेऊन आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष मा. शिवाजीराव उर्फ विद्याधर काकडे साहेब यांनी शेवगाव या ठिकाणी निर्मल ब्राईट फ्युचर ज्युनिअर स्कूल व कोटा एक्सलन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यामाने इ. ८ वी ते इ.१२ वी पर्यंत फाउंडेशन वर्गाची सुरवात केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा पुढे जावा. मेडिकल, इजिनिअरिंग व विविध स्पर्धा परीक्षामध्ये उज्वल यश मिळवावे म्हणून संस्थने शेवगाव सारख्या ग्रामीण भागात कोटा राजस्थान या ठिकाणावरून  IIT, NIT पात्र झालेले प्राध्यापक, शिक्षक मार्गदर्शक म्हणून नेमेले आहेत.

यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना NEET, JEE, MHT-CET व स्पर्धा परीक्षासाठी निश्चितच फायदा होणार आहे. 

JEE Mains परीक्षेत रोहित नांगरे याने प्रथम प्रयत्नात ९९.५४ गुण प्राप्त करून अहमदनगर जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. तर फुंदे शंतनू, आरे सार्थक, सातपुते रोहित, घुले गोविंदा व पांगरे प्राजक्ता यांनीही चांगले गुण प्राप्त करून परीक्षेस पात्र ठरले. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या यशस्वी विद्यार्थ्याचे संस्था अध्यक्ष अॅड. शिवाजीराव काकडे, जि.प.सदस्या सौ.हर्षदाताई काकडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

ग्रामीण भागातील स्थापन झालेल्या कोटा एक्सलन्स सेंटर मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करून भविष्यातील डॉक्टर, इंजिनीअर्स व्हावे असे आवाहन कोटा एक्सलन्स सेंटरचे  प्रमुख हरिष खरड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शिव अग्रवाल यांनी, सूत्रसंचालन प्रा.रावसाहेब मोरकर यांनी तर आभार राजेश दारकुंडे यांनी मानले.

अशोक वाघ -  शेवगाव अहमदनगर 


थोडे नवीन जरा जुने