अहमदनगर/नेवासा 


भेंडा:-
श्री मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेचे सुदामराव मते पाटील विद्यालय गोगलगाव येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय भुसारी सर होते यावेळी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन अध्यापक बाळासाहेब घावटे यांचे हस्ते करण्यात आले जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून ज्या विद्यार्थिनींचे वाढदिवस आज होते ते उत्साहात साजरे करण्यात आले.

यावेळी कु कोमल डुकरे, कु गौरी गव्हाणे,कु वनिता राजगुरू, कु दीप्ती नरवडे, कु पूनम डुकरे , श्वेता म्हस्के,यांची भाषणे झाली. यावेळी प्रस्ताविक नानासाहेब घुले सर यांनी केले यावेळी बोलताना संजय भुसारी सर यांनी सांगितले की चूल आणि मूल या प्रक्रियेतून महिला केव्हांच बाहेर पडली असून आज महिला भगिनींनी अनेक क्षेत्रात भरारी घेतली असून सामाजिक समतेची ही सुरवात आहे.

महिला भगिनीवर होणारे अत्याचार कमी होण्यासाठी सामाजिक प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब घावटे, दत्तात्रय काळे,पांडुरंग उगले, प्रवीण पवार,महेश पवार,समीर पठाण, काळे मॅडम, विजय गायकवाड,रघुनाथ म्हस्के परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन समीर पठाण यांनी केले.
थोडे नवीन जरा जुने