माय सह्याद्री टिम- अहमदनगर
अहमदनगर जिल्हात जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष पदावरुन मोठी चर्चा सुरु असुन जिल्हाचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहेत.यातच अध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार याकडे सर्व जिल्हाचे लक्ष लागले आहे.
उद्या दिनांक 6 मार्च रोजी निवड अंतीम टप्प्यात आली असुनया मध्ये शेवगाव- पाथर्डी मतदार संघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, पारनेरचे उदय शेळके, श्रीगोंदाचे माजी आमदार राहुल जगताप , पारनेरचे प्रशांत गायकवाड आणि श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे नाव समोर येत आहे.
जिल्हा बॅंक शेतकऱ्यांचा मोठा आधार असुन शेतकऱ्याची कामधेनु समजली जाणारी जिल्हा बॅक ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. म्हणूनच सर्व आजी - माजी आमदार अध्यक्ष व संचालक पदासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावताना दिसुन येत आहे. अहमदनगर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष पद आता उत्तरे कडे जाते कि दक्षिणेकडे या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे
अशोक वाघ - शेवगाव अहमदनगर
My Sahyadri Contact us- mysahyadrilive@gmail.com