शालेय विद्यार्थी व प्रवाशी यांच्या हिताची एसटी बस सेवा सुरू करण्याची मागणी.


माय सह्याद्री - शेवगाव

ग्रामीण भागातील बसेसच्या फेऱ्या सुरू करून विद्यार्थ्यांची आणि प्रवासी यांची होणारी गैरसोय दूर करण्याबाबत शेवगाव आगार प्रमुखांना तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ने निवेदन दिले आहे.
मा.आ.नरेंद्र घुले आणि मा.आ.चंद्रशेखर घुले   तसेच सभापती मा. डॉ  क्षितिज  घुले यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शेवगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व मंजुर बस फेरी सुरु करण्याबाबत शेवगाव एस टी आगारात ,आगारप्रमुखांना  निवेदन देण्यात आले, यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कमलेश लांडगे, सरपंच प्रदिप काळे,संतोष पावसे,रोहन साबळे,क्रुष्णा सातपुते, संकेत वांढेकर, दिपकराव चोपडे,यासह राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

माय सह्याद्री टीम- शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने