शेवगाव तालुक्यातील कांबीच्या सरपंचपदी नितिश पारनेरे उपसरपंचपदी सुनिलसिंग राजपूत
अहमदनगर/ शेवगाव
शेवगाव तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या संसद आदर्श गाव कांबी च्या सरपंचपदी बहुमताने नितीश बप्पासाहेब पारनेर यांची तर उपसरपंच पदी सुनील इंदरसिंग राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली .सरपंच पदासाठी नितिश पारनेरे व आसाराम कर्डीले, या दोघांचे उमेदवारी अर्ज राहील्याने मतदान घेण्यात आले. या मध्ये नितिश पारनेरे यांना ८ तर आसाराम कर्डीले यांना १ मते मिळाली. एकूण ११ सदस्यापैकी ८ सदस्यांनी मतदान केले . तर २ सदस्य तटस्त भुमिकेत होते. तर उपसरपंच पदासाठी सुनिलसिंग राजपुत यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
शेवगाव तालुक्याचे माजी आमदार डाॅ. नरेंद्र घुले पाटील तसेच माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटिल, विद्यमान सभापती डॉ. .क्षितीज घुले , अहमदनगर दक्षिणचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली कांबी येथे विश्वासनंद ग्रामविकास पॅनलने अकरा पैकी नऊ जागा जिंकल्या होत्या .केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश चंद्र होळकर व माजी सरपंच अशोक नाना म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली विश्वासगिरी ग्रामविकास पँनलने दोन जागा मिळवल्या. निवडणूक निर्णय अधिकारी कर्पे पी .जी. व सहकारी म्हणून ग्रामसेवक संदीप थोरात यांनी काम पाहिले .
यावेळी नवनिर्वाचित सदस्य बाबासाहेब सोनाजी मगर, कांताबाई अंबादास म्हस्के , सोभा सुरेश म्हस्के, कविता बाळासाहेब म्हस्के,मिनाक्षी दत्ता थोरात पिरमहमंद शेख ,अनिता चोरमले उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सरपंच नितिश पारनेरे म्हणाले , मी सर्वांना बरोबर घेऊन गावाचा विकास करून चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करीन .मी एकटाच सरपंच नसून गावातील सर्व नागरिक सरपंच आहेत .गटातटाचे राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध राहील .
नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटिल ,पंचायत समितीचे सभापती डॉ . क्षितिज घुले, माजी खासदार दिलीप गांधी , कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती बप्पासाहेब पारनेरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब म्हस्के युवा नेते सोमनाथ पाटील म्हस्के ,अविनाश म्हस्के, डाॅ. सतिश मनचुके ,सुनिल चने ,नितिन राजपुत,तसेच ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले .
अमोल म्हस्के - कांबी