My Sahyadri - शेवगाव अमोल म्हस्के
तालुक्यातील चापडगाव येथे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह शेवगावच्या श्री संत गाडगे महाराज कन्या छात्रालयात स्वच्छतेचा सुर्य श्री संत गाडगे महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने चापडगाव विदयालयाचे पर्यवेक्षक कांतेश्वर ढोले यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वसतिगृह अधिक्षिका अश्विनी अकोलकर तसेच वसतिगृह विद्यार्थिनी आकुश ऋतुजा ,बर्डे दिव्या ,पवार रेणुका ,दाभाडे निकिता ,शिंदे जयश्री आदी उपस्थित होते.
पर्यवेक्षक ढोले म्हणाले कि ,समाजात जेव्हा अज्ञान ,अनारोग्य आणि अंधश्रद्धेचा अंधार पसरलेला होता ;तेव्हा आपल्या हातात खराटा घेऊन एक स्वच्छता सूर्य समाजापुढे उभा ठाकला ,त्याचे नाव संत गाडगेबाबा होय . खराट्यासारख्या एका साध्या साधनातून गाडगेबाबांनी लोकसागरात स्वच्छतेचा दीपस्तंभ उभारला .स्वच्छता म्हणजे प्रदूषणापासून मुक्तता .सध्या कोरोना विषाणूचा वाढ प्रादुर्भाव पाहता हात साबणाने वेळोवेळी स्वच्छ धूवावेत , मास्कचा वापर करावा असे ते म्हणाले.
वसतिगृह अधिक्षिका अकोलकर म्हणाल्या कि , दरवर्षी गाडगे महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता साध्या पद्धतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक कॉ .आबासाहेब काकडे यांना गाडगे महाराज यांचा सहवास लाभला होता .त्यामुळे संस्थेच्या वसतिगृहाला श्री संत गाडगे महाराज छात्रालय असे नाव देण्यात आले आहे.
My Sahyadri - Team Contact us- mysahyadrilive@gmail.com
डेलीहंट वर भेट देऊन माय सह्याद्री ला फाॅलो करा