ढोरसडेत रस्ता कामाचा सभापती हस्ते शुभारंभ
शेवगाव
चांगले व मजबूत रस्ते धरणग्रस्त गावातील दळणवळण व्यवस्थेची सुधारणा होण्यास मदतशीर ठरतील असे वक्तव्य सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी केले. जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार सौ. राजश्रीताई चंद्रशेखर घुले यांच्या सेस फंडातून 15 वित्त आयोग अंतर्गत ढोरसडे येथील गणेश खंबरे वस्ती ते बॅकवॉटर जॅकवेल या साधारण दिड किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.

यावेळी ग्रामस्थांशी वार्तालाप करताना सभापती बोलत होते. शुभारंभ प्रसंगी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अॅड आनिल मडकेे, उपसरपंच माऊली निमसे , सेवा सोसायटी माजी अध्यक्ष बाबासाहेब खंबरे , चेअरमन बाबासाहेब माळवदे , गणेश खंबरे, संपत मगर, दादासाहेब खंबरे, संजय राऊत ,शिवाजी माळवदे, दत्ता माळवदे, भावराव माळवदे, पांडुरंग निकम, सोपान खंबरे, रमेश खंबरे, सचिन माळवदे, नाना राउत, कडुबाळ ठोंबळ, आण्णासाहेब शिंदे, शहरटाकळी सेवा सोसायटी माजी व्हा. चेअरमन संतोष शेटे ,गवळी कंडक्टर, बरबडे, किशोर निकम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
अशोक वाघ - शेवगाव