आव्हाणे खुर्द च्या सरपंचपदी सौ प्रतिभा भुसारी उपसरपंचपदी सुनील आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवडी प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी रमेश शिदोरे यांचे उपस्थित पार पडलेल्या सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुकीत अनुक्रमे सरपंच पदासाठी सौ प्रतिभा गणेश भुसारी व उपसरपंचपदासाठी सुनील विठल आहेर यांचे प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रमेश शिदोरे यांनी सरपंच पदासाठी प्रतिभा भुसारी व उपसरपंच पदासाठी सुनील आहेर यांची बिनविरोध निवड जाहीर केली.स्थानिक पातळीवर लढवल्या गेलेल्या या निवडणुकीत पक्षीय राजकारण न आणता आघाडी करून लढवल्या गेलेल्या निवडणुकीत साई गणेश मित्र मंडळ व विठल रुखमींनी ग्रामविकासमंडळाने प्रत्येकी तीन तीन जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे दोन्हीही मंडळांनी एकत्र येऊन पुढील पाचही वर्षे स्थानिक विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सर्वानी काम करण्याचा निर्णय घेतला.
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी रमेश शिदोरे ,कामगार तलाठी सी ए गडकर,ग्रामविकास अधिकारी श्रीमती फटाले जे एम,मोरे एस बी यांनी काम पाहिले. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शशिकांत काकडे, सौ विद्या आहेर ,सुजाता काकडे सौ कोमल सोंडे , उपस्थित होत्या.निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ज्ञानेश्वरचे नवनिर्वाचित संचालक बबनराव भुसारी,माजी जिल्हा परिषद सदस्य ऍड विनायकराव आहेर,काकासाहेब आहेर आबासाहेब आहेर, अरुनराव आहेर व्हाईस चेअरमन बाळासाहेब काकडे, चंद्रकांत काकडे ,अर्जुनराव भुसारी,
संजय भुसारी , नंदकिशोर आहेर,संभाजी भुसारी,शंकर काकडे ,अक्षय भुसारी, किसन पानसरे,संजय काकडे ,किसनराव काकडे,अशोक सोंडे,अशोक भुसारी, बापूसाहेब भुसारी,देविदास काकडे,सुरेश भुसारी, सतीश काकडे ,बद्रीशेठ आहेर,दिलीप भुसारी, किसन पानसरे,अशोक शिपलकर,राहुल आहेर,संजय दळे, लक्ष्मीकांत आहेर,महेश काकडे, किशोर सोंडे,ऋषिकेश आहेर,राम पठाडे,कुंडलिक काकडे,ज्ञानेश्वर काकडे ,गणेश चाहुर,एकनाथ मोटकर,भाऊसाहेब डमाळ, गणेश भुसारी, अंबादास कमानदार, संजय शिंदे ,नामदेव कमानदार अभिनंदन केले आहे.
अशोक वाघ - शेवगाव