माय सह्याद्री - शेवगाव
आज समाजात शैक्षणिक, सामाजिक व इतर सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारच्या साधन सामुग्री, आर्थिक स्वरूपाची मदतरूपी गरज असुन या कामी पुढाकार घेऊन भेंडा येथील युवाउद्योजक अभिजित युवराज देशमुख हे श्री एंटरप्राइजेस मार्फत शैक्षणिक ठिकाणी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याबद्दल सभापती डॉ क्षितीज घुले यांनी कौतुक केले आहे. शेवगाव तालुक्यातील घेवरी येथील जिल्हा परिषद शाळेला 25 लिटर क्षमतेचे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करणारे आर.ओ. फिल्टर व पाणी साठवणूक टाकी श्री एंटरप्राइजेस मार्फत भेट देण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमास सभापती डॉ.क्षितीज घुले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
त्यांच्या शुभहस्ते पाणी फिल्टर शाळेचे मुख्याध्यापक अशोक पवार व शिक्षक भारत वडते यांनी स्विकारले.मागील तीन वर्षांपासून श्री इंटरप्राइजेस मार्फत स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेत आर ओ फिल्टर व विविध शालेय उपयोगी साहित्य वितरणाचा समाजउपयोगी उपक्रम आमदार चंद्रशेखर घुले मित्र मंडळ व डॉ. क्षितिज घुले युवा मंच यांच्या माध्यमातून शैक्षणिक,सामाजिक क्रीडा,कला ,सांस्कृतिक, अध्यात्मिक आशा समाजउपयोगी भरवल्या जाणाऱ्या उपक्रमात अभिजित देशमुख हे सहभागी होऊन राबवत आहेत.
घेवरी येथील कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी कारभारी नजन, सरपंच सुभाष पवार, नवजीवन विद्यालय प्राचार्य विष्णू मरकड, गोदावरी व्हॅली पब्लिक स्कूल दहिगावने मुुख्याध्यापक शंकर काशिद, प्राध्यापक मकरंद बारगुजे, भागवत दाभाडे , पंजाब शिंदे , घेवरी शाळेचे मुख्याध्यापक अशोक पवार, शिक्षक भारत वडते सचिन कमानदार,शालेय व्यवस्थापन समीती अध्यक्ष रामेश्वर पाचे, लक्ष्मण कर्डिले, गोरक्ष कमानदार, दत्तत्राय कर्डिले , नवनाथ पाचे व घेवरी ग्रामस्थ उपस्थित होते.
माय सह्याद्री टीम- शंकर मरकड अशोक वाघ अहमदनगर