माय सह्याद्री टिम :- अहमदनगर 


जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे, मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय,अहमदनगर
  
भूगोल विभाग आयोजित भूगोल दिनाचे औचित्य साधून प्रमुख व्याख्याते प्रा.एम.टी.खेमनर (भूगोल विभाग प्रमुख) रमेश फिरोदिया महाविद्यालय साकुर,संगमनेर यांनी 'पदवीनंतर भूगोल विषयातील नोकरीच्या संधी' या विषयावर ऑनलाईन Google meet App  द्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला या प्रसंगी ते म्हणाले, भूगोलाची विभागणी प्राकृतिक भूगोल,मानवी भूगोल, प्रादेशिक भूगोल,अशी केली जाते. मानव व पर्यावरण याचा संबंध शोधणारे शास्त्र म्हणून भूगोल विषयाकडे पाहिले जाते. 

तसेच भौगोलिक माहिती प्रणाली GIS,GPS, Remote sensing स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने MPSC,UPSC  मध्ये भूगोल विषयाचे असलेले महत्त्व त्यातून विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नोकरीची संधी पर्यटन भूगोलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. शहरीकरण, आपत्ती व्यवस्थापन विभागांमध्ये तसेच लोकसंख्या जनगणना विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात धोरण जागृती माहिती विश्लेषक म्हणून काम करण्यास संधी भूगोल विषयातून मिळते कृषी भूगोल नकाशे तयार करण्याचा अभ्यासशिक्षणाच्या माध्यमातून भुलेखा परिषद म्हणून नोकरी करण्याची संधी उपलब्ध होते. 

तसेच भूगोल व इतर सर्व शाखांशी या विषयाचा असलेल्या संबंधाची माहिती दिली .या कार्यक्रमाचे अध्यक्ष- मा.प्राचार्य डॉ.एस .एम.कुऱ्हाडे एम.जी.पी.कॉलेज अहमदनगर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक (भूगोल विभाग प्रमुख) प्रा.एम.एल.कराळे यांनी केले.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका ए.आय.शेख यांनी करून दिला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ. के .आर .पिसाळ यांनी केले व  आभार प्रा एस. व्ही. मरकड यांनी केले. या ऑनलाइन व्याख्यानास गुगल मीट ॲप द्वारे 64 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

माय सह्याद्री टिम अहमदनगर 
थोडे नवीन जरा जुने