अहमदनगर घुले महाविद्यालयात मा. शरद पवार जन्म दिन वृक्षारोपण करून साजरा

माय सह्याद्री - अहमदनगर

 देशाच्या विकासात माननीय शरदचंद्रजी पवार यांचे बहुमोल योगदान आहे.त्यांनी कृषी,अर्थ,क्रीडा,शिक्षण व सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य कौतुकास्पद असुन आजही वयाच्या ऐंशीव्या वर्षी ते एखाद्या तरुणाप्रमाणे सामाजिक कार्यात तत्परतेने भाग घेत आहेत. 

त्यामुळे आज अनेक तरुणांचे आदरणीय शरदचंद्र पवार हे प्रेरणास्थान असल्याचे मत मारुतरावजी घुले पाटील कला,वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय,अहमदनगरचे प्राचार्य डॉ.एस.एम.कुऱ्हाडे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयात भारतचे माजी केंद्रीय कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त महाविद्याालय प्रांंगणात प्राचार्य डॉ.एस.एम.कुऱ्हाडे यांच्या शुभहस्ते वटवृक्षाचे रोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.के.आर.पिसाळ, एस.व्ही.मरकड, एम.एल.कराळे, पी.ए. फटांगरे, ए.के.आहेर, श्री दळवी,श्री.टी.आर.तेलधुने, श्यामा वाळके,नितीन शिरसाट आदी उपस्थित होते. 

माय सह्याद्री टीम- शंकर मरकड, अशोक वाघ, अहमदनगर

थोडे नवीन जरा जुने