माय सह्याद्री - अहमदनगर
रांजणी-दहिगावने येथील भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते यांनी शेवगाव पाथर्डी तालुक्याच्या आमदार मोनिका राजळे यांची नुकतीच त्यांच्या निवास्थानी भेट घेऊन परीसरातील विविध विकास कामाविषयी चर्चा केली. यात कारखाना गळीत हंगाम लक्षात घेता रांजणी - दहिगावने व इतर रोड वरील खड्डे बुजवण्यासाठी मागणी करण्यात आली . तर तालुका स्तरावरील विषेश अर्थसहाय्य व वैयक्तिक लाभाच्या निधीविषयी संपुर्ण तालुका स्तरावरील प्रकरणे तहसिलदार यांच्या माध्यमातून तत्परतेने मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी केली .
यावेळी कल्याण महाराज पवार,बाळासाहेब भिसे, शिवाजी मरकड,बाबासाहेब पानखडे, भागचंद काशीद,अशोकराव शिदोरे, देवीदास चव्हाण, शरद थोटे आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
माय सह्याद्री टीम- शंकर मरकड, अशोक वाघ, अहमदनगर