माय सह्याद्री अहमदनगर
रोटरी क्लब ऑफ शेवगाव सिटी व आर. सी. सी (रोटरी) क्लब ऑफ अमरापूर वतीने 2020 मध्ये घेण्यात आलेल्या महालक्ष्मी सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रेणुकामाता इंग्लिश मेडियम स्कुल अमरापूर येथे नुकताच पार पडला. स्पर्धकांचा  शेवगाव रोटरीचे अध्यक्ष किसनराव माने,माजी अध्यक्ष डॉ. संजय लड्डा, उपाध्यक्ष डॉ. मनीषा लड्डा, सेक्रेटरी बाळासाहेब चौधरी, आर.सी.सी चे अध्यक्ष महेश लाडणे, सेक्रेटरी दिपक भुक्कन, प्रदीप बोरुडे सर, बाळासाहेब सुसे सर, सौ. संध्या पोटफोडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

स्पर्धेसाठी पर्यावरण, श्रीभ्रूण हत्या, कोरोना महामारी,साक्षरता हे सामाजिक विषय सजावटीसाठी देण्यात आले होते. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या श्रीमती. सुनीता शेटे,सौ ज्योती शेटे, सौ संजीवनी महाजन, सौ प्रियांका राजहंस, सौ  अमृता बोरुडे, सौ ज्योती बोरुडे, सौ आशा गायकवाड,  सौ विद्या चौधरी, सौ संजीवनी चौधरी, सौ शारदा बोरुडे, सौ ज्योती महाजन,सौ उषाताई कर्डीले, सौ गंगुबाई पंडीत यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आर.सी.सी क्लब चे अमृता बोरुडे,योगेश खैरे,संदीप सुसे, रवींद्र लाड सर,गणेश सुसे, गणेश गरड, संदीप दुधाळ सर,अभिजित राऊत सर,शरद खैरे, अनंता बोरुडे,तुषार सुसे,आदिनाथ भुजबळ,इन्ट्रॅक्ट क्लब ऑफ अमरापूर चे सर्व पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

माय सह्याद्री टीम- शंकर मरकड ,अशोक वाघ ,अहमदनगर
थोडे नवीन जरा जुने