जयशिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 वी ऊस परिषद संपन्न
माय सह्याद्री - सांगली
आज देशातील अनेक शेतकरी संघटना एकत्र करून राजू शेट्टी साहेबांनी देशाच्या पातळीवर सगळ्या शेतकऱ्यांची एकजूट तयार केली. शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांवर त्यांनी देश पातळीवर लढा उभा केलाय.ऊसाचा भाव 3000 रुपयांच्या वर नेलाय..राज्यातील व देशातील सगळे शेतकरी राजू शेट्टींकडे अपेक्षेने बघताय .म्हणून देशातील शेतकरी चळवळ टिकण्यासाठी कोल्हापूर सांगलीकरांनो या माणसाला जपा भविष्यात चळवळ पंगू झाली तर शेतकऱ्यांचे मोठे शोषण होत राहील. यासाठी राजू शेट्टींची गरज देशातल्या प्रत्येक शेतकऱ्याला आहे असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केले. ते 2 तारखेला जयशिंगपूर येथे झालेल्या राजू शेट्टींच्या मार्गदर्शनाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या19 व्या ऊस परिषदेत बोलत होते.
या देशात लोकशाही येऊनही इथं दररोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात.इथल्या शेतकऱ्यांच्या अंगावरची साल नाही.पण 2002 पासून ऊस परिषद घेऊन स्वतःच्या शेतमालाचा भाव ठरवण्याचा व तो वेळ प्रसंगी रक्त सांडवून मिळवण्याचा आदर्श राजू शेट्टी साहेबांनी देशातल्या शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे.या संघर्षात अनेकदा अंगावर पोलिसांच्या लाठ्याकाठया पडल्या..गुंडांनी जीव घेणे हल्ले केले.. असंख्य गुन्हे झाले.पण हा लढा 18 वर्ष जीव पणाला लावून राजू शेट्टींनी यशस्वी केला.
रात्रंदिवस या माणसाने कष्ट घेतले .महिना महिना घरी न येता राज्यभर , देशभर शेतकऱ्यांसाठी लढत राहिले.पण लोकसभेच्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेत जातीयतेचं विष पेरून , अफवा पसरवून राजू शेट्टींचा पराभव केला.या पराभवामुळे चळवळीत काम करणाऱ्या नवं पिढीचा आत्मविश्वास ढासळू लागला.राजू शेट्टी सारखं सामान्य कुटुंबातील असामान्य नेतृत्व कोल्हापूरच्या जनतेनंच खांद्यावर घेतलंय..व राजू शेट्टींनीही स्वतःचं आयुष्य शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे समर्पित केलं.राजकारणात राहूनही स्वतःचे हात स्वच्छ ठेवले. म्हणून देशातल्या शेतकऱ्यांचा लढा लढण्यासाठी या प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी प्रमाणे खंबीर उभे रहा. अफवांना बळी पडू नका..राजू शेट्टींना काळजात अखंड जपा.. अस संदीप जगताप यांनी आपल्या मनोगतातून कोल्हापूर- सांगली च्या जनतेला भावनिक आवाहन केलं.
माय सह्याद्री टीम- शंकर मरकड अशोक वाघ अहमदनगर
My Sahyadri contact us mysahyadrilive@gmail.com