माय सह्याद्री - शेवगाव


ज्योती क्रांती को -ऑपक्रेटिव सोसायटी लिमिटेड या अर्थिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या संस्थेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी या ठिकाणी ज्योती क्रांती ग्राहक सेवा केंद्राची शाखा सुरू केली असून ग्राहक सेवा केंद्राचे उद्घाटन  

शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अॅड अनिल मडके यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी शहरटाकळी सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिलीप राजळे, माजी सरपंच अण्णासाहेब शिंदे, मा.उपसरपंच भाऊसाहेब राजळे, तालुका विकासक चंद्रशेखर ढवळे ,पाथर्डी ता.विकासक विकास भोसले,पाथर्डी शाखाधिकारी सचिन देवढे, ज्योती क्रांतीचे वसुली अधिकारी अनिल काळे, ज्योती क्रांतीचे जनसंपर्क अधिकारी रितेश साळुंके, शेवगाव ग्राहक सुविधा केंद्र धारक अशोक वणवे ,रावसाहेब मुंडे, कडुबाळ घुले, बबन खंडागळे, लाजरस कोल्हे, संदिप विश्वंभर आदी मान्यवरांसह शहर टाकळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते. शहरटाकळी ग्राहक सेवा केंद्राचे संचालक विठ्ठल घुले यांना उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देत चांगल्या ऑनलाईन सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. आभार विठ्ठल घुले यांनी व्यक्त केले.

ग्राहक सेवा केंद्रात ग्राहक हित जोपासना होईल - संचालक घुले
शहरटाकळी या बाजारपेठ गावात शेजारील ४-६ गावांचा दैनंदिन आर्थिक व्यवहार होत असतो. आणि आज सर्वच व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होताहेत यात ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना झटपट व विश्वासार्ह सेवा देण्यासाठी सतत प्रयत्न शील राहुन सुरू केलेल्या नवीन ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्रातून ग्राहक हित जोपासना होईल असे मत शहरटाकळी ज्योती क्रांती ग्राहक सेवा केंद्राचे संचालक विठ्ठल घुले यांनी व्यक्त केले.

माय सह्याद्री टीम- शंकर मरकड ,अशोक वाघ ,अहमदनगर
थोडे नवीन जरा जुने