सैन्य दलात निवड झालेल्या युवकांचा सभापती डॉ . घुले यांच्या वतीने सन्मान कार्यक्रम.

माय सह्याद्री - अहमदनगर /शेवगाव

अपार कष्ट, मेहनत व जिद्द ठेवून तुम्ही सैन्य दलात भरती झालात आई वडीलांच्या अपेक्षेला खरे उतरलात आता आपल्या कार्य कर्तुत्वाने देशाच्या सैन्य दलात चमकदार कामगिरी करत तालुक्याचे नाव उज्वल करा असे आवाहन सभापती डॉ क्षितिज घुले यांनी केले. नुकताच सैन्य दल भारतीचा निकाल लागला असुन तालुक्यातील १६ भुमिपु़त्राची यात निवड झाली आहे. त्यांचा निवडीबद्दल सत्कार समारंभ सोमवार रोजी सभापती डॉ क्षितिज घुले यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी निवड झालेल्या तालुक्यातील युवकांचे कौतुक करत सन्मान करण्यात आला. यावेळी तालुक्यातील निवड  झालेले ( काही युवक वेळेअभावी कार्यक्रमास येऊ शकले नाही ) युवक पुढील प्रमाणे अंकुश वाघ- काळेगाव, योगेश म्हस्के- वरूर,सोमेश्वर घुगे- घोटन,सचिन गावडे- माळेगाव महेश दळे- वाघोली ,निखिल गिते- वाघोली ,अमोल खताळ - वाघोली ,चंद्रशेखर डोळशे - वाघोली ,सुरेश आव्हाड - वडुले ,कानिफनाथ तोरमड - भाविनिमगाव
सागर शेळके - भाविनिमगाव ,गोविंद काळे -आंतरवली ,आंबादास राऊत - लाडजळगाव आदी तालुकाभरातुन निवड झालेल्या युवकांचे सत्कार करण्यात आले . यावेळी तालुक्यातील युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अविनाश मरकड, विष्णू मुंजाळ, प्रविण मरकड, रोहन साबळे, संतोष पावसे, संकेत वांढेकर, नवनाथ वारुळेवारुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

माय सह्याद्री टीम- शंकर मरकड अशोक वाघ अहमदनगर

थोडे नवीन जरा जुने