मी माझ्या जीवनात अनेक पुढारी पाहिले, परंतु डॉ. पूरनाळे यांच्यासारखा अत्यंत हुशार, चारित्र्यवान व सर्वगुणसंपन्न असा पुढारी मी आजपर्यंत पाहिला नाही. मी कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यक्रमाला जात नाही परंतु डॉक्टरांच्या दशक्रिया विधीला मी पंढरपूरयेथून आलो आहे. डॉ.पुरनाळे हे पुढारी नसून ते सर्वसामान्यांचे, गोरगरीबांचे मायबाप होते असे प्रतिपादन ह.भ.प.दिग्विजय महाराज यांनी शेवगाव येथे केले. डॉ. टी.के.पुरनाळे यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम आज शेवगाव तालुका शीतकरण संघ पाथर्डी रोड शेवगाव याठिकाणी सोशल डिस्टगसिंगचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज तांबे यांचे हरिकीर्तन झाले. यावेळी मा.आ. नरेंद्र घुले, ॲड.प्रताप ढाकणे, मा.खा.तुकाराम गडाख, भाजपचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर, पं.स. सदस्य संजय कोळगे, जि.नि.सदस्य दिनकरराव गर्जे, मनसेचे देवीदास खेडकर, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, ह.भ.प. बाबागिरी महाराज, जगन्नाथ गावडे, संजय आंधळे, सुरेश चौधरी, गणेश कराड, अनंता उकिर्डे, संजय फडके, बाळासाहेब मुरदारे, दहिफळचे सरपंच संजय शिंदे, कचरू चोथे, विष्णू दिवटे, नवनाथ खेडकर, बाळासाहेब मुंदडा आदी उपस्थित होते.
गोरगरिब, कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी मोठे योगदान दिलेला नेता - अॅड प्रताप ढाकणे.
डॉ. पूरनाळे हे उच्च विचार असणारे नेते होते. गोरगरिब, कष्टकरी, शेतकऱ्यांसाठी मोठे योगदान दिलेला नेता आज तालुक्याने गमावला आहे. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असतांना त्यांनी त्याकडे कधी व्यवसाय म्हणून पाहिलेच नाही. त्यातून पैसा मिळावा हा त्यांचा कधीच हेतू नव्हता. फक्त गोरगरिबांची सेवा म्हणूनच त्यांनी त्याकडे पाहिले.
शेवगावच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा- डॉ. नरेंद्र घुले.
डॉ.पुरनाळे एक अजात शत्रू होते. शेवगाव तालुक्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. शेती, व्यापार, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात शेवगाव तालुका प्रगतीपथावर आहे त्याचे श्रेय डॉ. पूरनाळे व कै.मारुतराव घुले यांना जाते. शेवगावच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या कार्यक्रमास असंख्य जनसमुदाय उपस्थित होता. यावेळी सोशल डिस्टगसिंगचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.
डॉ. पुरनाळे यांच्यामुळेच मी आमदार - मा. खा. तुकाराम गडाख.
डॉ.पुरनाळे यांनी नेहमी लोकहिताची कामे केली. राजकीय क्षेत्रात काम करत असताना मिळालेल्या अधिकाराकडे त्यांनी जनसेवेची जबाबदारी म्हणूनच पाहिले. डॉ. पुरनाळे यांच्यामुळेच मी आमदार होऊ शकलो. त्यांनी पाठिंबा दिला नसता तर कदाचित मी आमदारही झालो नसतो. तेच खरे किंगमेकर होते. माजी खासदार तुकाराम गडाख.
माय सह्याद्री टीम- शंकर मरकड, अशोक वाघ, अहमदनगर.