माय सह्याद्री - अहमदनगर/शेवगाव
राज्यातील विविध भागात व क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असलेल्या व काहींना पदोन्नतीत बढती तर काहींंची नवीन नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच गावी आल्याने ढोरजळगाव ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मुर्ती असलेले ढोरजळगावचे सुपुत्र नवीमुंबई पोलीस उपायुक्त पुरूषोत्तम कराड (भारतीय पोलीस सेवा IPS) , संतोषजी आठरे (तहसीलदार) व योगेश खैरे (प्रशासकीय अधिकारी कोपरगाव) प्रा.सुनिल कराड ( शास्त्रज्ञ कोल्हापूर विद्यापीठ) यांचा समावेश आहे.या सत्कार प्रसंगी ग्रामपंचायत प्रशासक सुधाकर लांडे, राजु देशमुख, श्रिधर डोळस, रावेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे,उद्योग उपसंचालक प्रमोद लांडे,,मा.सरपंच गणेश कराड ,माजी उपसरपंच अनंता उकीर्डे, किरण लांडे, रोहन साबळे ,आकाश साबळे,सुरज बेळगे,शरदकुमार फसले,प्रदीप लांडे,किरण हंबर, नितीन गिर्हे तसेच गावातील तरुणमित्र आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी सत्कार ला उत्तर देतांना पुरूषोत्तम कराड यांनी सांगितले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी स्पर्धा परीक्षा कडे वळले पाहिजे त्यांना याकामी आपण सर्वतोपरी सहकार्य करू तसेच शेवगाव मध्ये लवकरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालु करण्याचा माणस व्यक्त केला.
माय सह्याद्री टीम- शंकर मरकड अशोक वाघ अहमदनगर