न्यू इंग्लिश स्कूल आदिनाथनगर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा
माय सह्याद्री - अहमदनगर / पाथर्डी
वाचनाने माणूस सुसंस्कृत व ज्ञान संपन्न होतो. त्यासाठी वेगवेगळे शैक्षणिक व ग्रंथ संपदा वाचन करून आपले शैक्षणिक, भौगोलिक, ऐतिहासिक ज्ञान वाढवण्यासाठी वाचन संस्कृती जोपासाली पाहिजे असे मत मुख्याध्यापक बाळासाहेब ताठे यांनी व्यक्त केले.
पाथर्डी तालुक्यातील आदिनाथनगर येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये माजी राष्ट्रपती डॉ .ए पी.जे .अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब ताठे, सहशिक्षक तानाजी गवळी, शामसुंदर रक्ताटे, अरूण कराळे, मिलिंद गायकवाड, बाळासाहेब राजळे, रामेश्वर राजळे आदी उपस्थित होते.
माय सह्याद्री टीम- मंगेश शेरकर, कासार पिंपळगाव,अहमदनगर