माय सह्याद्री- शंकर मरकड- अहमदनगर
साधी राहणी,उच्च विचार, दूरदृष्टी,अष्टपैलू व प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व असलेले प्राचार्य -डॉ.टी.एम.वराट यांच्या कार्या विषयी माय सह्याद्री टीम ने घेतलेला आढावा.
जानेवारी 2016 साली अहमदनगर येथील मारूतरावजी घुले पाटील महाविद्यालयात प्राचार्य पदी डॉ. विराट यांची नियुक्ती झाली.त्यावेळी प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक,सीनियर कॉलेज सर्व एकाच ठिकाणी नागापूर येथे सुरू होते. तर बोल्हेगाव राघवेंद्र स्वामी मंदिरा परीसरात महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे काम सुरू होते.
सरांनी आम्हा प्राध्यापकांना सांगितले की, मारुतरावजी घुले पाटील साहेबांच्या नावाप्रमाणे मोठी इमारत होणार आहे.त्याच बरोबर उच्च शिक्षण,विद्यार्थी अध्ययन-अध्यापन प्रक्रिया, उत्तम होणे,प्राध्यापक व विद्यार्थी गुणवत्ता वाढणे गरजेचे आहे.सरांच्या प्रदीर्घ अनुभवातून विद्यार्थी,प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये हळूहळू बदलही झाला. तसे प्राचार्य डॉ.टी.एम.वराट हे विद्यार्थी प्रिय प्राचार्य होत गेले . ते त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमातून दाखवून दिले. मात्र कॉलेजमध्ये त्यांची एक वेगळीच आदर्श युक्त भीती होती. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी,प्राध्यापक,कर्मचारी यांना आपोआप खूप शिस्त लावली. महाविद्यालयात त्यांच्या विषयी एक आपुलकी होती. कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यावर त्यांचा प्रभाव पडत आसे. त्या मुळे हळूहळू विद्यार्थ्यांना शिस्त लागत गेली. सर नेहमीच महाविद्यालय प्रशासन तेथील नियम व वेळोवेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दिल्या जाणाऱ्या सूचना बाबतीत कायम
कटाक्षाने पाहत असत. सरांचे मराठी शुद्धलेखन अचूक होते.ते वेळोवेळी महाविद्यालयीन दिलेल्या सूचना लिखाणातून जाणवत होते.
तर इंग्रजी विषयावरही खूप प्रभुत्व होते पण सरांनी त्यांचा मी पणा (अहंकार) कधीही दाखवला नाही. त्यांच्या भाषणातून नेहमी सांगत होते की,प्राध्यापकाने रोज एक पान इंग्रजी लेखन केले पाहिजे. कॉलेज प्रमाणेच घुले घराण्यावर मनापासून प्रेम होते. माझे कॉलेज म्हणून कॉलेज प्रशासनात काम केले. संस्था अध्यक्ष मा.आमदार नरेंद्र घुले पाटील ,संस्था सचिव-मा.आमदार चंद्रशेखर घुले पाटील , जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार सौ.राजश्रीताई घुले पाटील,पंचायत समिती सभापती शेवगाव,मा.डॉ.क्षितिज घुले पाटील यांच्या अथक प्रयत्नातून महाविद्यालयास नवीन जागेसह इमारत बांधकाम सुरू करून ते लवकर पूर्ण केले.तसेच महाविद्यालय नवीन जागेवर स्थलांतरित केल्यानंतर इमारतीच्या राहिलेल्या बांधकामामध्ये त्यांच्या अनुभवातून बरेच चांगले बदल घडवून आणले.त्याचबरोबर परिसर सुशोभीकरण होण्यासाठी आवर्जून लक्ष घातले.माननीय डॉ. वराट यांच्या चार वर्षाच्या कार्यकाळात महाविद्यालयामध्ये खूप बदल झाला.अहमदनगर शहरातील एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे केंद्र म्हणून महाविद्यालयाची ओळख निर्माण झाली. त्यांनी संस्थेच्या ध्येय,धोरणा प्रमाणे संस्था प्रशासन,प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी समवेत केलेली कामे
1) दोन टप्प्यांमध्ये माननीय आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मार्गदर्शनातून महाविद्यालय परिसरात वनस्पती उद्याना बरोबरच परिसरात अनेक प्रकारची 332 झाडे लावली गेली.
2)माननीय आमदार नरेंद्रजी घुले पाटील यांच्या मार्गदर्शनातून गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत स्वतंत्र विद्यार्थी,विद्यार्थिनी,प्राध् यापक पार्किंग व्यवस्था,पार्किंग साठी इंटरनल तार कंपाउंड.
3) सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील यांच्या चर्चेनुसार महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्र ची सुरुवात. वार्षिक 'क्षितिज' अंक सुरुवात.एक दिवशीय वेगवेगळ्या उपक्रमाअंतर्गत कार्यशाळा कार्यक्रमाची सुरुवात.4) सायन्स प्रॅक्टिकल साठी वेळोवेळी विद्यापीठ प्रॅक्टिकल साहित्य,जर्नल खरेदी.
5) संगणक विभाग, प्राणीशास्त्र,भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, सिमिनार हॉल,प्राध्यापक स्टाफ रूम, वेगवेगळ्या लॅब मध्ये चार्ट,पडदे,एलसीडी प्रोजेक्टर,फर्निचर सह लाईट फिटिंग.
6) विद्यापीठ परीक्षा सेंटर, झेरॉक्स मशीन, मोठे जनरेटर,परीक्षा विभागासाठी इंटरनल परीक्षा रेकॉर्ड पेपर, साहित्य ठेवण्यासाठी रॅक, फर्निचर.
7) प्राचार्य रूम, प्राचार्य रेस्ट, रूम लाईट फिटिंग सह फर्निचर काम पूर्ण.
8)संगणक विभागासाठी फर्निचर सह स्वतंत्र लॅब, संगणक संच,इंटरनेट सुविधा, संगणक विभागाला लागणाऱ्या सर्व सुविधा केल्या.
9)कार्यालयीन कामकाजासाठी स्वतंत्र ऑफिस फर्निचर, लाईट फिटिंग विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या कार्यालयीन कामासाठी स्वतंत्र व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी बाहेरील बाजूस ओटा व ध्वजारोहण कार्यक्रमासाठी स्टेज
10)IQACसाठी स्वतंत्र फर्निचर सह संगणीकृत रेकॉर्ड रूम.
11)महाविद्यालयात आत येण्यासाठी नवीन डांबरीकरण रस्ता अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षा नामदार सौ. राजश्रीताई घुले पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून काम पूर्ण. 12)विद्यार्थ्यांसाठी क्लास रूम साठी बँच व्यवस्था.
13)नवीन ब्लॅक बोर्ड,लेक्चर स्टॅन्ड
14)इमारतीवरील पावसाच्या पाण्यासाठी रेन हार्वेस्टिंग प्रोजेक्ट.
15) इमारतीसमोरील झाडांसाठी गार्डन बांधकाम व बाहेरील बाजूस वटा.
16) महाविद्यालयाच्या इमारतीवरील महाविद्यालयाचे नाव व झाडांच्या नावासाठी नेम प्लेट
17)ग्रंथालयासाठी दोन टप्प्यांमध्ये ग्रंथ खरेदी, ग्रंथ ठेवण्यासाठी कपाट,रॅक, रीडिंग रूम साठी फर्निचर
18)सरांच्या मार्गदर्शनातून धर्मदाय आयुक्त कार्यालयातून रीतसर माजी विद्यार्थी संघाची स्थापना.
19) विद्यार्थ्यांसाठी बाहेरील पोर्चमध्ये फर्निचर मध्ये नोटीस बोर्ड.
वरील सर्व कामे महाविद्यालय नॅक पूर्ततेसाठी करण्यात आली आहे.नॅक अहवाल 80% प्राध्यापक समवेत पूर्ण केले आहे.
हे देखील वाचा.....
त्यांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक या संस्थेमध्ये 35 वर्ष प्राध्यापक म्हणून नोकरी करत असताना भूगोल विभाग प्रमुख,उपप्राचार्य,दोन पंचवार्षिक नॅक समन्वयक म्हणून काम पाहिले तसेच लासलगाव महाविद्यालयात प्राचार्य व आपल्या मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय,अहमदनगर येथे दिनांक-01/06/2016 ते दिनांक-02/10/2020 असे चार वर्ष प्राचार्य पदावर काम केले.
आज सरांचे वय 66 वर्ष पूर्ण झाले आहे परंतु काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती त्यांच्यात होती. आजही ते जिल्हा मराठा या संस्थेमध्ये वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व बदल सांगावे तितके कमीच पडेल.सरांच्या प्रदीर्घ अनुभवातून मी खूप काही शिकलो.माझ्या पुढील जीवनात त्याचा मला उपयोग होईल.सरांनी दिलेले प्रेम व मार्गदर्शन माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कधीही विसरणार नाही. सरांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो
संकलन
प्रा.एस.व्ही.मरकड
कला शाखा व इतिहास विभागप्रमुख एम.जी.पी.कॉलेज अहमदनगर.
माय सह्याद्री टीम- अशोक वाघ ,अहमदनगर