महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन जिल्हाध्यक्ष अमोल वाकोडे यांचे प्रतिपादन

माय सह्याद्री - नांदेड 

महाराष्ट्रातील पुरोगामी विचारसरणीचे फुले-शाहू-आंबेडकर सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असणारे समाजातील तळागाळातील सर्वसामान्य माणसातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सतत अग्रेसर असणारे महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या स्वकर्तृत्वावर व्यक्तीमत्वावर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या सामाजिक चळवळीच्या माध्यमातून जी सामाजिकतेची नाळ जोडलेली आहे.महाराष्ट्रातील सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करून, एक सामाजिक जाणीव असणारे, ज्यांनी स्वर्गीय सखाराम बाळा पाटील सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये शेवटच्या घटकापर्यंत महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून आपले सामाजिक बांधिलकी जोपासून ,आपल्या अडीअडचणी शासन दरबारी मांडून महाराष्ट्र मध्ये एनजीओच्या माध्यमातून एक खूप मोठे न्यायप्रविष्ट असे काम करण्याचं नियोजन करून आपल्या सोबत सतत संपर्कात राहून. 

आपल्या सर्व एनजीओ धारकांना मार्गदर्शन करून सर्वांच्या अडीअडचणी सोडून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत असणारे सामाजिक बांधिलकी जोपासणारे युवक म्हणजे दिपक आगळे पाटील. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र असल्याकारणाने फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श वारसा आपल्या हृदयात ठेवून समाजातील सामान्य माणसाला आपल्या संस्थेच्या माध्यमातून कसा न्याय देता येईल .सदैव त्यांनी प्रयत्न केलेला आहे, आतिशय योग्य असलेल्या कामाला निश्चितपणे यश मिळेल आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशनच्या सर्व जिल्हाध्यक्ष तथा सर्व पदाधिकार्‍यांच्या वतीने आपल्या संघटनेच्या सोबत आहोत.

आम्हाला आपल्या सतत मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे.आपलं काम अत्यंत पारदर्शक व समाजहिताचे असून आम्हाला विश्वास आहे. की येणाऱ्या काळात आमचा जो सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हेतू संकल्पना होती. ते ध्येय होते ते आपल्या माध्यमातून मार्गी लागतील, खरंच आपल्या कार्याला सलाम करतो. कारण आपण समाजातील शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून काम करत आहेत.असे मत महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन नांदेड जिल्हाध्यक्ष अमोल वाकोडे यांनी व्यक्त केले. 

माय सह्याद्री टीम- शंकर मरकड, अशोक वाघ ,अहमदनगर

थोडे नवीन जरा जुने