अहमदनगर/ शेवगाव: 

माय सह्याद्री - शेवगाव -शंकर मरकड

शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले व सौ.तेजस्विनी क्षितिज घुले पाटील यांच्या कन्या कु. युगंधरा हिचा द्वितीय वाढदिवस शेवगांव स्थीत दादाजी वैशंपायन वृद्धाआश्रमात  साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी आश्रमातील वृद्धांना फळ व उबदार बॅल्यांकेट युगंधरा च्या हस्ते भेट देण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कामाची बांधिलकी, परंपरा सुरू ठेवत आज तालुक्याचे  सभापती यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करत  जनसामान्यांत मिसळुन काम करणारा युवा नेता असल्याची  प्रचिती  वाढदिवसाच्या निमित्ताने निदर्शनास आली.

एक साधी राहणी जनसामान्यांसारखे जिवन जगत समाजातील तळागाळातील जनतेला आपले मानत कधी वृधांची आपुलकी ने चौकशी करने, युवकांबरोबर मैदानी खेळ खेळत प्रोत्साहन देणारे तर तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून हरेक समाज घटकाशी संपर्क ठेवणारे सभापती म्हणून डॉ. क्षितिज घुले पाटील यांच्या बद्दल जनसामान्यांचे मत प्रदर्शन व्यक्त होत आहे. त्यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस साध्या पद्धतीने व गरज आपुलकी दाखवण्याच्या योग्य अशा वृध्दाश्रम ठिकाणी करून समाजात एक आदर्श ठेवला आहे ज्याचे समाजाने निश्चितच विचार व आचरण करण्याची  गरज आहे. 

माय सह्याद्री टीम - शंकर मरकड, अशोक वाघ, अहमदनगर.

थोडे नवीन जरा जुने