माय सह्याद्री -अहमदनगर/ शेवगाव :
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील आबासाहेब काकडे बी. फार्मसी महाविद्यालयाने अनेक विक्रम नोंदवले आहेत व त्यास विश्वासहर्तासह उतुंग भरारी घेतली आहे. देश पातळीवरील सर्वात प्रतिष्टीत ऑल इंडिया एन आई पी आर परीक्षेत आबासाहेब काकडे बी. फार्मसी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी आकाश गाडेकर याने विशेष प्रविन्यासह पात्रता प्राप्त केली आहे.
नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळ शेवगावच्या व्यवस्थापनाने कायमच बोधेगावच्या बी. फार्मसी महाविद्यालयास पाठिंबा दर्शवत व्यावसायिक व जागतिक दर्जाचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळवण्यासाठी महाविद्यालयास प्रोत्साहित करत आहेत. काकडे ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष अँड. विद्याधरजी काकडे साहेब आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी आकाश गाडेकर सह प्राचार्य डॉ. शशिकांत पट्टण आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्याना महाविद्यालयास मोठे यश मिळाल्याबद्दल अभिनंदन करून आनंद व्यक्त केला.
एन आई पी आर हि फार्मसी, मायक्रोबायोलॉजि, बायोटेनोलॉजि, आणि लाईफ सायन्स या क्षेत्रातील सर्वोच स्पर्धा परीक्षा आहे ज्या मध्ये मुंबई, कोलकत्ता, हैदराबाद, बंगलोर, भुवनेश्वर, दिल्ली, चेन्नई, पटना इत्यादी ठिकाणाहून फार्मसीच्या उत्कृष्ट विद्यार्थानी पात्रता प्राप्त केली आहे. महाराष्ट्रातील फारच कमी विद्यार्थी या परीक्षेत पात्र झाले आहेत.
आणि आकाश गाडेकर ही परीक्षा पात्र होणे हा एक अभिमान आहे. डॉ. शशिकांत पट्टण यांनी या यशाबद्दल आकाश गाडेकर चे अभिनंदन केले आहे व काकडे ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे अध्यक्ष अँड. विद्याधर काकडे साहेब, जिल्हा परिषद सदस्या सौ. हर्षदाताई काकडे, समन्वयक श्री. संपतराव दसपूते, उप-प्राचार्य भरत जाधव शैक्षणिक विभाग प्रमुख संदीप बडधे यांच्यासह विद्यार्थीना प्रोत्साहित करणाऱ्या व पाठींबा दर्शविनाऱ्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
स्वर्गीय आबासाहेब काकडे यांचे स्वप्न आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी घेतलेला सततचा लढा यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाची गुणवत्ता मिळण्यास मदत झाली आहे. ग्रुप ऑफ फार्मसी कॉलेज लवकरच बोधेगाव व अहमदनगर येथे एम. फ़ार्म आणि पीएचडी सेंटरसाठी योजना आखत आहे.