माय सह्याद्री सोलापूर
सोलापूरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापिठाच्या ए.टी.के.टी. (ATKT) च्या ऑनलाईन परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. या ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यापिठाकडून स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आलेले आहे. परंतु या परीक्षा सुरु असताना यामध्ये बफरिंगची अडचण, सव्र्हर जाम, पेपर ऑटो सेव अशा विविध तांत्रिक अडचणी सुरु झाले आहे. तसेच इनऑरग्यानिक ट्राफिक निर्माण होऊन हे सव्र्हर डाऊन झाले. परिणामी विद्याथ्र्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये एरर 504, गेटवे टाइम अप, लोडिंग असे म्यासेज येत होते. त्यामुळेविद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेमध्ये रात्री 9 वाजेपर्यंत जरी टाईम वाढवून मिळाला तरी व्यवस्थितपणे परीक्षा देता आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसताना परीक्षेमध्ये अपयश मिळण्याची भिती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना स्पष्ट तक्रारीचे निवेदन दिलेले आहे.
याबाबत आमदार प्रणिती शिंदे यानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापिठ, सोलापूरचे मा. कुलगुरु यांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापिठाच्या सुरु असलेल्या ए.टी.के.टी. (ATKT) च्या ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलून त्यातील तांत्रिक अडचणींची दुरुस्ती करुन त्या परीक्षेचे व्यवस्थित नियोजन करुन परत घेण्यात याव्यात अशी निवेदनाव्दारे मागणी केली.
माय सह्याद्री टीम- शंकर मरकड, अशोक वाघ अहमदनगर