बोडखे ग्रामपंचायत विकास कामांचा शुभारंभ


माय सह्याद्री- अहमदनगर/शेवगाव :

बोडखे ग्रामपंचायत वतीने गाव अंतर्गत रस्ते सिमेंट कॉक्रेटीकरण , वृक्षारोपण व विविध ग्राम विकास कामांचे  उद्घाटन सभापती डॉ घुले यांच्या हस्ते  रविवार रोजी करण्यात आले. यावेळी बोडखे धरणग्रस्त गावात सरपंच नानासाहेब वेताळ यांच्या पुढाकाराने होत असलेली विविध ग्रामोपयोगी कामे ही वाखाणण्याजोगी असुन धरणग्रस्त गावांनी सार्वजनिक विकास कामांना प्राधान्य द्यावे असे मत व्यक्त केले. 

शेवगाव तालुक्यातील बोडखे येथे ग्रामपंचायत विविध विकास कामा अंतर्गत गावात सिमेंट रस्ते कामाचा शुभारंभ व प्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले. तदनंतर  खुंटेफळ, ताजनापूर, बोडखे या तीन गावातील क्रिकेट खेळाडूं  अजिनाथ वेताळ ,गौतम सुपारे ,अभीजित शेळके ,तुषार आरले,  ऋषी सूपारे  ,विनायक वेताळ यांनी एकत्र येऊन आयोजित  केलेल्या केटीबी 

क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करून सभापती  यांनी युवकांन बरोबर फलंदाजी करून युवा क्रिकेट खेळाडूंचा आनंद  द्विगुणित करत खेळाडूंना प्रोत्साहन दिले. तर उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना ग्रामीण खेळाडू राज्य व देश पातळीवर चमकावा अशी अपेक्षा व्यक्त केली. 


यावेळी माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती  संजय कोळगे, एरंडगाव  पंचायत समिती गण सदस्य  मंगेश थोरात, बोडखे सरपंच नानासाहेब वेताळ,  एरंडगाव समसुद सरपंच संतोष  धस, प्रा. कारभारी   नजन , सोसायटी चेअरमन लक्ष्मण नजन, उपसरपंच मच्छिंद्र वेताळ, दिपक गरुड, आत्माराम वेताळ,  दिलीपराव सुपारे, सागर तिजोरे, श्रीकृष्ण बर्डे,  सुरेश गजभिव, अमोल धस, संतोष बर्डे तसेच बोडखे, ताजनापूर, खुंटेफळ येथील युवक खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते.

माय सह्याद्री टीम - शंकर मरकड ,अशोक वाघ, अहमदनगर   
थोडे नवीन जरा जुने