माय सह्याद्री - अहमदनगर/ शेवगाव, शंकर मरकड
आदरणीय माजी आमदार नरेंद्र पाटील घुले व माजी आमदार चंद्रशेखर पाटील घुले , जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, सभापती डॉ क्षितीज पाटील घुले यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली विद्यालयाची परंपरा व घुले बंंधू यांनी टाकलेल्या विश्वासास तडा जावु न देता विद्यालय व विद्यार्थी हित जोपासनेवर सर्व शिक्षक सहकारी यांच्या माध्यमातून प्रयत्नशील राहील असे मत प्रा. आण्णासाहेब काटे यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव येथील रहिवासी प्राध्यापक आण्णासाहेब दत्तात्रय काटे यांची शिरसगाव ता. नेवासा येथील वकिलराव लंघे पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्ती झाली आहे. मारूतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता माध्यमिक विद्यालय भेंडा येथे प्राध्यापक म्हणून प्रा. काटे कार्यरत होते. नियुक्ती निमित्ताने विद्यालयाच्या वतीने प्रा. काटे यांचा तर प्रभारी प्राचार्य बाबासाहेब धनवटे यांची भेंडा येथे पर्यवेक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने दोघांचा सत्कार करण्यात आला.
यावेेळी बोलताना प्रा. काटे बोलत होते. यावेळी प्रभारी प्राचार्य बाबासाहेब धनवटे , शिक्षक सर्व श्री संजय भुसारी , दत्ता जरे , महेश देशमुख, श्रीहरी वीर, गणेश देशमुख , सोमनाथ नाईक, केदारनाथ आगळे, अतुल राजेभोसले , गणेश शिदोरे, योगेश गवळी, संभाजी काळे, दिपक शेलार , सागर वाघमारे, सचिन मोरे , प्रसाद सौदागर, संतोष गायकवाड , असीम शेेख , निलेश खंडागळे , महेश गाढे, सुयोग घोरपडे ,बल्लाळ करणराज ,श्रीमती गीतांजली देशमुख, श्रीमती नुतन फासे, श्रीमती जया अंधारे, दादासाहेब निळा, संतोष नाबदे, मारुती घुले, दिपक पठाडे, पंजाब शिंदे, जयसिंग खंडागळे, नाना गायके, भारत बोरुडे आदी उपस्थित होते. प्रा. काटे यांच्या नियुक्ती बद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे , शिरसगाव सरपंच छगणराव खंडागळे , उपसरपंच दत्तात्रय पोटे , वसंतराव देशमुख, दत्तात्रय पोटे टेलर, सुनील लंघे फक्कडराव देशमुख , अरुणराव देशमुख, दादाभाऊ पोटे आदींनी अभिनंंद केले आहे .
माय सह्याद्री टीम- अशोक वाघ ,अहमदनगर