वृक्षारोपणाने स्व.मारुतरावजी घुले पाटील जयंती साजरी
माय सह्याद्री रिपोर्ट-
स्व.मारुतराव घुले पाटलांनी ग्रामीण भागामध्ये सहकाराच्या माध्यमातून शैक्षणिक, सहकार, सामाजिक, कृषी, औद्योगिक, सिंचनाची मुहुर्तमेढ रोवली.समाजात वावरतांना कधीही दुजाभाव केला नाही.समाजकारण करताना तळागाळातील कार्यकर्त्यांना बरोबर घेवून राजकारणातही वेगळा ठसा उमटविला. त्यामुळे स्व.मारुतरावजी घुले पाटील ग्रामीण भागाचे खरे शिल्पकार ठरले आहेत.असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप बामदळे यांनी केले.स्नेह कला मंच व भिमाई फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मारुतरावजी घुले पाटील यांच्या जयंती निमित्त शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथील दळवी वस्ती प्राथमिक शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राजेश फटांगरे होते. यावेळी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब जाधव, संदीप बामदळे, जेष्ठ कार्यकर्ते मोहनराव दळवी यांनी आपल्या भाषणातून स्व.घुले पाटलांचे कार्य विषद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब दळवी यांनी केले. सूत्रसंचालन भिमाई फाऊंडेशनचे अध्यक्ष ऋषीकेश दळवी यांनी केले.तर शिवाजी दळवी यांनी आभार मानले.यावेळी सरपंच राजेश फटांगरे, पोलीस पाटील सुनील घुमरे, जोहरापुर चे माजी सरपंच अशोक देवढे, स्नेह कला मंचचे बाबासाहेब जाधव, भास्कर दळवी,ग्रा.प.सदस्य शिवाजी काळे, भिमाई फाउंडेशन चे सचिव सुभाष दळवी,संदीप दळवी, कुणाल साळवे, मोहन नजन, सुरेश आठरे आदि उपस्थित होते.
माय सह्याद्री टीम शंकर मरकड ,अशोक वाघ, शेवगाव.