माय सह्याद्री - शेवगाव अहमदनगर


महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी मराठा महासंघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी भाविनिमगाव येथील अनिल सुपेकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष कृषीराज टकले यांचे नियुक्ती पत्र नुकतेच भाजपा जिल्हा अध्यक्ष अरुण  मुंढे यांच्या हस्ते देऊन नगराध्यक्ष विनोद  मोहिते, उपनगराध्यक्ष वजिर पठाण,  गुरुनाथ माळवदे, अंकुश ढाकणे, अमोल काटे, डॉ अनिल चिकने यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. सध्या मराठा समाजाची होत असलेली गळचेपी व शासकीय स्तरावर अवहेलना या विरोधात आणि शेतकरी न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहुन संघटन वाढविण्यावर भर देणार असल्याचे मत नवनियुक्त तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर यांनी व्यक्त केले. 

सुपेकर हे खासदार सुजय विखे समर्थक असुन त्यांच्या निवडीबद्दल परीसरातील साई फाऊंडेशन अध्यक्ष डॉ. अरूण पवार, आबासाहेब राऊत, संतोष शेळके, संभाजी गवळी, उदय शिंदे, आत्माराम कुंडकर,बापु शेळके,भाविनिमगाव सरपंच पांडुरंग मरकड, भाजपा पदाधिकारी बशीर पठाण, मुस्साभाई शेख, संदीप खरड, सुभाष बरबडे, बाळासाहेब विखे, मठाचीवाडी सरपंच सतिष धोंडे, राम मुंगसे, शिवाजी खराडे, प्रा. नारायण काळे, नंदकुमार शेळके, आसाराम न-हे, शाम जाधव, लक्ष्मण काशीद, नागेश शेळके, सोपान जाधव, नवनाथ येथे, अशोक वाघ, राहुल व्यवहारे,पत्रकार शंकर मरकड आदींनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. 

माय सह्याद्री टीम
शंकर मरकड ,अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने