जायकवाडीच्या असंपादित क्षेत्रातील पिकांचे पंचनामे करावे ,जणआधार सामाजिक संघटना तालुकाध्यक्ष हरिष जायभाये यांचे मंत्री जयंत पाटील यांना निवेदन.


माय सह्याद्री- शंकर मरकड

सलग दुसऱ्यांदा जायकवाडी धरणाचे पाणी असंपादित क्षेत्रात आल्याने पिकांच्या झालेल्या नुकसानी चे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी जणआधार सामाजिक संघटना शेेेवगाव तालुका अध्यक्ष हरीष जायभाये यांच्या समवेत धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री मा.जयंत पाटील यांची मंत्रालयीन दालनात भेट घेऊन निवेदन देेेऊन केेली

निवेदनात नमुद करण्यात आले की मागील वर्षी जायकवाडी धरणाच्या बॅकवॉटरने असंपादित जमिनीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यांचे पंचनामे होऊन पीक परीगणना तक्ता  प्राधिकरण कार्यालया कडे सादर करण्यात आला होता. एक वर्ष उलटले तरी संबंधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नुसन.या प्रकरणी तातडीने कार्यवाही करत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. यंदा ही तीच परिस्थिती झालेली आहे  शेतकऱ्यांनच्या तूर,भुईमूग, ऊस,कपाशी ,फळबाग इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले.त्यांचे पंचनामे तात्काळ होणे गरजेचे असून तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी निवेदनात केली आहे. जणआधार चे तालुका अध्यक्ष हरिष जायभाये ,सहसचिव अमोल भोसले, रवींद्र कराड आदी मंत्री जयंत पाटील यांना निवेदन सादर करताना उपस्थित होते.

जायकवाडी ने शेतकरी जगवला आणि मारलाही -हरीष जायभाये.
संपूर्ण मराठवाड्यातील जनता ,उद्योग आणि  कोरडवाहू शेती, शेतकरी यांना जगवण्यासाठी आणि या परीसरातील पाण्याचा ( पिण्याचे व शेती ) दुष्काळ हटवण्यासाठी जायकवाडी प्राधिकरण जायकवाडी प्रकल्पात मोठा पाणी साठा करते. सद्य परिस्थितीमध्ये धरणातील गाळाचे वाढते प्रमाण लक्षात न घेता हा पाणी साठा केला जातो यामुळे काठालगतच्या शेतीत पाणी शिरून असंपादीत जमीनीवर मोठ्या प्रमाणात शेतीपीक नुकसान होते आहे. याचा विचार जायकवाडी प्राधिकरण यांच्या कडून होत नसून मराठवाड्यातील शेतकरी जगला पाहिजे तर धरणाच्या उभारणी साठी जमीनी दिलेला नगर जिल्ह्यातील शेतकरी मेला तरी बेहत्तर अशी परिस्थिती असताना जायकवाडी जलसाठा हा असंपादीत जमीनीवर येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून काठालगतचा शेतकरी जगेल. कारण आजपर्यंत धरणग्रस्त मरतच आला आहे.  जायकवाडी ने मराठवाड्यातील शेतकरी जगवला आणि नगर जिल्ह्यातील मारताहेत. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

माय सह्याद्री टीम -शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.
थोडे नवीन जरा जुने