अहमदनगर /शेवगाव : 

माय सह्याद्री - शंकर मरकड

रखडलेला धनगर समाज आरक्षण प्रश्न व अनुसूचित जातीचे आरक्षण मिळावे,आरक्षण याचीका सुनावणी जलदगती ने व्हावी ,आदीवासी सवलती, मेंढपाळ प्रश्न व इतर समाज लाभाच्या मागणी साठी सकल धनगर समाज शेवगाव तालुका यांच्यावतीने तहसीलदार अर्चना पागिरे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथराव गावडे, रा.स.प.चे तालुकाध्यक्ष आत्माराम कुंडकर, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक निवृत्ती दातीर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रलंबित प्रश्नबाबत  मनोगत व्यक्त केले. 

यावेळी नगरसेवक भाऊसाहेब कोल्हे, नगरसेवक गणेश कोरडे,अजय नजन, विनायकराव नजन,सरपंच बबनराव भुसारी,गणेश खंबरे,नवनाथ तागड,धर्मराज तागड,पाराजी वाघमोडे,मल्हारी नजन,नवनाथ गाढे, काकासाहेब सुडके,विष्णू सुडके, श्रीधर सुडके आदी समाज बांधव उपस्थित होते . 

माय सह्याद्री टीम- शंकर मरकड , अशोक वाघ शेवगाव अहमदनगर.
e-mail- mysahyadrilive@gmail.com
थोडे नवीन जरा जुने