माय सह्याद्री- 

काकडे शैक्षणिक समूह नेहमी वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी खुले करून देत असते याचा फायदा विद्यार्थ्यांनी अध्ययनासाठी करून घेणे गरजेचे आहे यासाठी आमचे काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष व मार्गदर्शक अॅड विद्याधर काकडे व सौ.हर्षदाताई काकडे नेहमी प्रयत्नशील असतात असे प्रतिपादन शहरटाकळीे विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब भगत यांनी केले. ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना NEET आणि JEE सारख्या परीक्षांचे दर्जेदार मार्गदर्शन मिळावे आणि या परीक्षा विद्यार्थीना सोप्या होऊन यश मिळावे या उद्देशाने शहरटाकळी माध्य आणि उच्च माध्यमिक विद्यालय येथे कोटा एक्सलन्स सेंटर शेवगाव यांच्या वतीने पालक प्रबोधन वर्गाचे आयोजन नुकतेच विद्यालयात करण्यात आले होते. 


हेही वाचा....

शेतकऱ्यांचा सन्मान वाढवणे गरजेचे – डॉ. नरेंद्र घुले पाटील


कोटा एक्सलन्स सेंटर शेवगााव समन्वयक हरीष खरड यांनी आपल्या मनोगतात कोटा एक्सलन्स सेंटर मार्फत चालवल्या जाणाऱ्या फौंडेशन कोर्स पासून NEET आणि JEE इ स्पर्धा स्पर्धा परीक्षा च्या अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली तर डॉ.सिंग यांनी आपल्या मार्गदर्शनात स्पर्धा परीक्षा चे सोपे स्वरूप आणि भविष्यातील संधी विशद केल्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक व अध्यक्षीय सूचना विद्यालयाचे पर्यवेक्षक चेमटे एस.एस यांनी मांडली तर सुत्रसंचलन आदिनाथ काटे यांनी केले.कार्यक्रमास फोपसे एन.पी ,कमानदार एस.के यांचेसह शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी पालक उपस्थित होते. 


हेही वाचा...

ग्रामीण फार्मसिस्ट कोवीड योद्धा म्हणून सन्मानित

माय सह्याद्री टीम शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.

थोडे नवीन जरा जुने