शेवगाव तालुका प्रहार संघटनेचे जिल्ह्यधिकारी यांना निवेदनाद्वारे साकडे.
माय सह्याद्री रिपोर्ट- शंकर मरकड
गेल्या महिनाभरापासून होत असलेल्या जोरदार पावसाने संपूर्ण तालुक्यातील खरीप हंगामातील पिके हि पावसाने अक्षरशा झोडपुन काढली असताना गेल्या पंधरा दिवसापासून होत असलेल्या जोरदार व अखंडपणे होणाऱ्या पावसाने बाजरी, कपाशी, तुर, मुग, उडीद,सोयाबीन, कांदा,ऊस ही पीके अक्षरशा सडुन गेली आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाच्या हातुन खरीप हंगाम गेल्यात जमा असुन सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत करण्याची गरज आहे.
अशी विनंती वजा मागणी अहमदनगर जिल्हाधिकारी राहुल दिवे्दी यांच्या कडे निवेदनाद्वारे शेवगाव तालुका प्रहार संघटनेचे वतीने तालुकाध्यक्ष संदिप बामदळे यांनी सोमवार रोजी केली आहे. तसेच जायकवाडीच्या पाण्याचा असंपादित हजारो एकर जमिनीवर शिरकाव केला असल्याने कडेच्या शेतक-यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागतो आहे. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने तात्काळ आदेश देऊन पंचनामे करण्यात यावेत अन्यथा तालुका तहसील कार्यालयात कुठल्याही क्षणी आमरण उपोषणाला प्रहार संघटना तयार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष संदिप बामदळे, अशोक देवढे, दादासाहेब दळवी, संजय पवार, बाबासाहेब जाधव आदी शेवगाव प्रहार संघटना पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहे.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.