शेवगाव तालुक्यातील सुलतानपूर बुद्रक (मठाचीवाडी) येथील ग्रामपंचायतने उभारलेल्या स्वच्छ पाणी पुरवठा करणा-या आरो प्लॅट चे उदघाटन शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांच्या हस्ते गुरुवार रोजी संपन्न झाले.
यावेळी कोरोना पार्श्वभूमीवर माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आॅक्सजन तपासणी करण्यात आली. या वेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ. कैलास कानडे, विस्तार अधिकारी रामकिसन जाधव , सरपंच सतिष धोंडे, उपसरपंच संजय जगदाळे, ग्रामसेवक सबलस मॅडम, शासकीय ठेकेदार अविनाश मरकड, केंद्र प्रमुख रघुनाथ लबडे , पोलिस पाटील आबासाहेब वाघ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष वाघ, सोसायटी चेअरमन बबनराव जगदाळे, व्हा. चेअरमन सोमनाथ सामृत, भाऊसाहेब करंजे, विकास जगदाळे, पवार सर , गणेश जगदाळे, पत्रकार अशोक वाघ आदी उपस्थित होते. दोन्ही कार्यक्रम कोरोना पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग चे पालन करत पार पडले.
प्रतिनिधी अशोक वाघ, शंकर मरकड - शेवगाव