माय सह्याद्री रिपोर्ट- अहमदनगर/ पाथर्डी: 
नादुरुस्त पाईपलाईन असेल ती तातडीने दुरुस्ती करावी असे आदेश देत प्रत्यक्ष तलावात उतरून माहिती घेत मंत्री तनपुरे यांनी उद्या पासून वांबोरी चारीतुन तातडीने पाणी सोडून मढी या वांबोरी चारी योजनेच्या टेल पासून तलाव भरण्यास सुरू करावे असा आदेश कार्यकारी अभियंता यांना मंत्री तनपुरे यांनी दुरध्वनी वरून दिले .पाथर्डी तालुक्यातील मढी येथील पाझर तलावात मुळा ओव्हरफ्लो चे पाणी वांबोरी चारीतुन सोडून हा तलाव भरून घेण्यात यावा अशी मागणी पाथर्डी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड व मढी देवस्थान अध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. 

याची तात्काळ दखल घेऊन दोन दिवसात मढी येथील तलावाची मंत्री तनपुरे यांनी समक्ष पाहणी करून परीस्थिती जाणून घेत केलेल्या मागणी ला हिरवा कंदील दाखवत संबंधित अधिका-यांना पाणी सोडण्याच्या सुचना दिल्या आहेत. मुळा धरण भरल्याने नदीपात्रात सोडले तसे पाणी वांबोरी चारीतुन सोडून चारी वरील तलाव भरून देण्यात यावे यासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले व शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ क्षितिज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य व मढी देवस्थान अध्यक्ष शिवशंकर  राजळे व तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड यांनी नामदार प्राजक्त  तनपूरे यांच्या कडे पाठपुरावा व विनंती केली होती. 

जिल्ह्यात सर्वत्र झालेल्या पावसाने जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणे भरली आहेत परंतु पाथर्डी तालुक्यातील बहुतांश भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. जेमतेम पाऊस पडतो त्यामुळे परीसरात पाणी लोट होत नसल्याने मढी येथील तलाव रिकामा आहे. यावेळी पाथर्डी  राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष चंद्रकांत मरकड, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, मा.सरपंच भगवान मरकड ,मा .अध्यक्ष बाबासाहेब भिटे, भाऊ पाटील लवांडे, भगवान मरकड,अशोक मरकड, ,संभाजी गायकवाड,सचिनमरकड,संदीप राजळे,आप्पासाहेब मरकड,विष्णू मरकड,इलियास शेख,दादासाहेब मरकड,छत्रपती मरकड,अशोक मरकड,कार्यकारी अभियंता सायली पाटील व मढी ग्रामस्थ उपस्थित होते.

माय सह्याद्री टीम 
My Sahyadri contact us - mysahyadrilive@gmail.com 
थोडे नवीन जरा जुने