अहमदनगर -
सहकारच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून शैक्षणिक, राजकीय, सहकार, सामाजिक क्षेत्रात स्वर्गीय घुले यांनी समाजासाठी काम करताना भेदभाव न करता समाजहितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करून शेतीसिंचन व कृषी औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवण्यात लोकनेते स्व. मारुतरावजी घुले पाटील यांचे बहुमोल योगदान असल्याचे प्रतिपादन अहमदनगर घुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ टी. एम. वराट यांनी केले.
जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे,मारुतरावजी घुले पाटील महाविद्यालय, अहमदनगर येथे संस्थापक स्व.लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांची ९० वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ वराट बोलत होते. चालू शैक्षणिक वर्षात कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहता सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून शासकीय नियम पाळत स्वर्गीय घुले पाटील यांच्या प्रतिमेचे प्राचार्य डॉ.वराट यांच्या हस्ते पुजन करून उपस्थितांन अभिवादन केले. यावेळी प्रा.एन.एन. झिंज,पी.ए.फटांगरे,एस.व्ही.मरकड,.एस.ए.काळे,के.आर.पिसाळ,पी.एस.साबळे,एस.डी.अबक, .एफ.बी.खान, एम.एल.कराळे, व प्रशासकीय सेवक यांच्या उपस्थितीत पूजन करून साहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
माय सह्याद्री टीम
शंकर मरकड, अशोक वाघ, शेवगाव.